News Flash

महिलेकडील मोबाइल खेचून पळ

सांताक्रुझ परिसरातील लिंक रस्त्यावर गेल्या आठवड्यात ही महिला सकाळी फिरण्यासाठी गेली होती.

 

मुंबई : सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या महिलेच्या हातातील मोबाइल खेचून पळ काढणाऱ्या दोघांना सांताक्रुझ पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सांताक्रुझ लिंक रस्त्यावर घडली होती. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महिलेच्या हातातून मोबाइल खेचून पळ काढला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मोहम्मद सरफराज मोहम्मद मुबीन खान (२५) आणि अब्बास अहमद सय्यद (२१) याला अटक केली आहे.

सांताक्रुझ परिसरातील लिंक रस्त्यावर गेल्या आठवड्यात ही महिला सकाळी फिरण्यासाठी गेली होती. यावेळी सरफराज आणि अब्बास हे दोघे पाठीमागून दुचाकीवरून आले. त्यांनी महिलेचा मोबाइल खेचून पळ काढला. याप्रकरणी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होताच पोलीस उपनिरीक्षक शिवाजी शिंदे, पोलीस हवालदार संतोष पाटील, पोलीस शिपाई परब यांच्या पथकाने तांत्रिक तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रणाच्या मदतीने आरोपींचा धारावीपर्यंत माग काढला. गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह पोलिसांनी सरफराज याला ताब्यात घेतले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 12:13 am

Web Title: pull out the woman mobile and run away akp 94
Next Stories
1 उद्वाहन तंत्रज्ञांना ‘बस’ प्रवासास परवानगी
2 बेस्ट कर्मचाऱ्यांना बालसंगोपन रजा
3 लस घेणे बंधनकारक करण्याची आवश्यकता
Just Now!
X