News Flash

‘पुणे येथील तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाला अवाजवी प्रसिद्धी नको’

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात माध्यमप्रणित सुनावणीबाबत निकाल देताना उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शकतत्त्वांचे पालन करावे

(संग्रहित छायाचित्र)

पुणे येथील एका २२ वर्षांच्या तरूणीची कथित आत्महत्या आणि तिचे एका राजकीय नेत्याशी असलेल्या कथित संबंधांच्या प्रकरणाला अवाजवी प्रसिद्ध देऊ नका, अशी सूचना उच्च न्यायालयाने शुक्रवारी प्रसारमाध्यमांना केली आहे.

तसेच सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात माध्यमप्रणित सुनावणीबाबत निकाल देताना उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शकतत्त्वांचे पालन करावे असेही न्यायालयाने म्हटले आहे.

या तरुणीच्या वडिलांनी केलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठाने प्रसारमाध्यमांना या प्रकरणाला अवाजवी प्रसिद्ध न देण्याची सूचना केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2021 12:22 am

Web Title: pune girl suicide case doesnt need publicity abn 97
Next Stories
1 खासगी रुग्णालयांमध्येही नोंदणीची सुविधा
2 उन्नत जलद मार्गात अडथळे
3 साहित्यप्रेमींच्या सेवेसाठी ‘किताबखाना’ पुन्हा सज्ज
Just Now!
X