News Flash

मुंबई – पुणे, नाशिक, शिर्डी टॅक्सी सेवा आजपासून महाग

मुंबईपासून पुणे, नाशिक आणि शिर्डी येथे जाणाऱ्या शेअर टॅक्सीच्या दरात शुक्रवारपासून भाडेवाढ करण्यात आली आहे.

| September 20, 2013 12:11 pm

मुंबईपासून पुणे, नाशिक आणि शिर्डी येथे जाणाऱ्या शेअर टॅक्सीच्या दरात शुक्रवारपासून भाडेवाढ करण्यात आली आहे. याबाबत मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने निर्णय घेतला असून ही दरवाढ ५० ते ७५ रुपयांपर्यंत असेल.
मुंबईहून नाशिक, पुणे आणि शिर्डी येथे जाण्यासाठी वातानुकुलित आणि बिगर वातानुकुलित सेवा चालवल्या जातात. या सेवांना प्रतिसादही चांगला आहे. सध्या वाढलेल्या इंधनाचे भाव लक्षात घेऊन प्राधिकरणाने या सेवांच्या प्रतिप्रवासी भाडय़ात वाढ केली आहे. या दरवाढीनुसार मुंबई-नाशिक वातानुकुलित टॅक्सीसाठी ४२५ रुपयांऐवजी ४७५ रुपये, मुंबई-शिडी वातानुकुलित टॅक्सीसाठी ५५० रुपयांऐवजी ६२५ रुपये, मुंबई-पुणे वातानुकुलित सेवेसाठी ३७५ रुपयांऐवजी ४२५ रुपये आणि बिगर वातानुकूलित सेवेसाठी ३०० ऐवजी ३५० रुपये प्रतिप्रवासी घेतले जाणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2013 12:11 pm

Web Title: pune nashik mumbai shirdi cab fares to rise
Next Stories
1 परतीचा मुसळधार पाऊस!
2 उड्डाणपुलाखाली गुंडटोळय़ांचे बेकायदा वाहनतळ सुरूच
3 अ‍ॅसिड दुर्घटनेत चार मुले जखमी
Just Now!
X