महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवडय़ात होण्याची शक्यता खात्रीलायक सूत्रांकडून वर्तविण्यात आली आहे. तसेच येत्या दहा दिवसांमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्य़ाची दाट शक्यता असताना, सोमवारी सकाळपासून टि्वटरच्या इंडिया ट्रेंडमध्ये चक्क ‘पुन्हा कॉंग्रेस’ (#PunhaCongress) हे ‘हॅश टॅग’ ट्रेंडिंग लिंस्टमध्ये आल्याने राजकीय वर्तुळात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे राज्यातही सत्ताबदल होईल आणि आघाडी सरकारला नारळ दिला जाईल, अशी शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात असताना ‘पुन्हा कॉंग्रेस’ या ट्रेंडमुळे राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुन्हा कॉंग्रेसच्या माध्यमातून आघाडी सरकारच्या चांगल्या वाईट कामांचा आघावा घेतला जात आहे. आघाडी यावेळीसुद्धा एकत्रितपणे लढेल, असे वरिष्ठ नेत्यांकडून सांगितले जात असताना कार्यकर्ते अद्याप संभ्रमात आहेत. मात्र, दुसरीकडे महायुतीतही सर्वकाही आलबेल आहे असं नाही. महायुतीमधील पक्ष आपापला अहंकार सोडायला तयार नसल्याने, महायुतीचे विसर्जन होणार अशा बातम्यांना ऊत आलेला आहे. दरम्यान, ‘पुन्हा कॉंग्रेस’ वर सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया उमटत असल्या तरी हा ट्रेंड आघाडीच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण करण्यासाठी आणि महायुतीसाठी डोकेदुखी ठरण्यासाठी पुरेसा ठरू शकतो.
#PunhaCongress चे काही निवडक टि्वट्स पुढीलप्रमाणे;