राज्यात केवळ १२४ गटांचे लिलाव झाले असून मोठय़ा प्रमाणावर अवैध रेती उत्खनन सुरू आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या देखरेखीखाली यंत्रणा उभारून रेती तस्करी थांबविण्याची मागणी मंगळवारी विधान परिषदेत करण्यात आली. त्यावर राज्यात अवैध रेती उत्खनन प्रतिबंध करण्यासाठी तहसील व उपविभागीय स्तरावर भरारी पथकांची स्थापना करण्यात आलेली असून त्यांच्याकडून मोठय़ा प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

भंडारा जिल्ह्य़ातील तुमसर तालुक्यातील अवैध रेती उत्खनन रोखण्याबाबत विधान परिषद सदस्य डॉ.परिणय फुके यांनी प्रश्न उपस्थित केला होता.