News Flash

लहान मुलांसाठी जीवरक्षक प्रणालींची खरेदी

मुंबईत सध्या करोना रुग्णांसाठी १ हजार ४८० जीवरक्षक प्रणाली सर्वांसाठी उपलब्ध आहेत.

टाळेबंदी शिथिल होत असताना पालिकेने दुसऱ्या बाजूला तिसऱ्या लाटेची तयारी सुरू केली आहे.

३३ उपकरणांसाठी ८ कोटी रुपये खर्च

मुंबई : करोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांच्या आरोग्याला धोका असल्याची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे पालिकेने लहान मुलांसाठी जीवरक्षक प्रणालीची खरेदी करण्याचे ठरवले आहे. प्रत्येक (व्हेंटिलेटर) जीवरक्षक प्रणालीसाठी महानगरपालिका २९ लाख ३९ हजार रुपये खर्च करणार असून ३३ जीवरक्षक प्रणालीसाठी महानगरपालिके ला ८ कोटी ३५ लाख रुपयांचा खर्च येणार आहे.

टाळेबंदी शिथिल होत असताना पालिकेने दुसऱ्या बाजूला तिसऱ्या लाटेची तयारी सुरू केली आहे. करोना भव्य उपचार केंद्रातील काही खाटा लहान मुलांसाठी राखीव ठेवल्या जात आहेत. तसेच लहान मुलांसाठीचे कक्ष तयार केले जात आहेत. त्याचबरोबर पालिकेने आता लहान मुलांसाठी कृत्रिम श्वसन उपकरणे घेण्याचेही ठरवले आहे.

मुंबईत सध्या करोना रुग्णांसाठी १ हजार ४८० जीवरक्षक प्रणाली सर्वांसाठी उपलब्ध आहेत. दुसऱ्या लाटेत जीवरक्षक प्रणालींची (व्हेंटिलेटर) गरज वाढल्याने पालिकेने जीवरक्षक प्रणालींची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच तिसरी लाट बालकांसाठी घातक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेने बालकांसाठी स्वतंत्र कोविड केंद्र बनविण्याबरोबरच जीवरक्षक प्रणालींची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेने ग्णालयासाठी ३३ ‘पेडियाट्रिक कम निओनॅटल व्हेंटिलेटर‘ खरेदी करण्याचे ठरवले आहे. याबाबतचा खरेदीचा प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे. उपकरणांच्या खरेदीबरोबरच देखभालीचाही खर्च यात समाविष्ट करण्यात आला आहे.

महानगरपालिकेने प्रत्येक मशीनसाठी २८ लाख १० हजार रुपये या दराने अंदाजपत्रक तयार केले होते. मात्र, पात्र ठरलेल्या पुरवठादाराने ३० लाख ५१ हजार रुपये दराने यंत्रणा पुरविण्याची तयारी दाखवली होती. त्यामुळे पालिकेने या पुरवठादाराबरोबर वाटाघाटी केल्यावर २९ लाख ३९ हजार रुपयांत ही यंत्रणा पुरविण्याची तयारी दाखवली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2021 12:16 am

Web Title: purchase life saving systems young children akp 94
टॅग : Coronavirus
Next Stories
1 घरोघरी नाही, पण घराजवळ लसीकरण
2 रुग्णालयात पाणी शिरू नये याची काळजी घ्या
3 गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता बोगद्यासाठी पालिकेची जाचक अट 
Just Now!
X