28 September 2020

News Flash

तपासाचा हेतू पूर्वग्रहदूषित नको!

निवृत्त पोलीस महासंचालक ज्युलीओ रिबेरो यांनी दिल्ली पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांना खडसावले

(संग्रहित छायाचित्र)

नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलनकर्त्यांवर कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी सेवेत दाखल होताना घेतलेल्या शपथेनुसार कर्तव्य बजावले आहे का? याची खातरजमा करा, अशा शब्दांत निवृत्त पोलीस महासंचालक ज्युलीओ रिबेरो यांनी दिल्ली पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांना खडसावले. शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या पोलिसांनी ईशान्य दिल्लीत उफाळलेल्या दंगलीस जबाबदार असलेल्या राजकीय नेत्यांविरोधात दखलपात्र गुन्हे का नोंदवले नाहीत, असा सवालही केला.

रिबेरो यांनी श्रीवास्तव यांना पत्र पाठवून लोकशाही मार्गाने, शांततेत आंदोलन करणाऱ्यांविरोधात नोंद गुन्ह्य़ांचा तटस्थपणे तपास व्हावा, ते अल्पसंख्याक आहेत म्हणून तपासाचा हेतू पूर्वग्रहदूषित असू नये, अशी विनंती केली. आंदोलनकर्त्यां मुस्लीम महिलांना कारागृहात डांबणाऱ्या दिल्ली पोलीसांनी चिथावणीखोर भाषणे ठोकून दंगल घडविणाऱ्यांविरोधात दखलपात्र गुन्हा का नोंदवला नाही? कपील मिश्रा, अनुराग ठाकूर, परवेश वर्मा यांना न्यायालयात का खेचले नाही? असे प्रश्न विचारले. प्रा. अपूर्वानंद आणि हर्ष मांदेर यांना या जातीय दंगलीच्या गुन्हयात गुंतवणे, हा आणखी एक चिंताजनक विषय आहे, असे नमूद करत रिबेरो यांनी पत्रात  पोलीस दल जात-धर्म, पंथ किंवा राजकीय हितसंबंधांना नव्हे तर संविधानाला बांधील असल्याची आठवण करून दिली. सुधारीत नागरिकत्व कायद्याला विरोध करणाऱ्यांना पाठिंबा देणारे दंगलीचे मुख्य सूत्रधार आहेत, कट रचून किंवा ठरवून ही दंगल घडविण्यात आली, असा निष्कर्ष काढून पोलिसांनी प्राध्यापक अपूर्वानंद यांच्याकडे चौकशी केली होती. पोलिसांच्या चौकशीनंतर अपूर्वानंद यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेनुसार दंगलीमागील सूत्रधार शोधण्याची पोलिसांची धडपड अभिनंदनपात्र आहे. मात्र त्यांचा निष्कर्ष चिंताजनक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2020 12:27 am

Web Title: purpose of the investigation should not be biased julio ribeiro abn 97
Next Stories
1 जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष
2 ऑक्सिजनचा पुरेसा साठा; पण वितरणात अडचणी
3 मुंबईत आणखी २३२१ रुग्ण, ४२ मृत्यू
Just Now!
X