27 February 2021

News Flash

गुणवत्तापूर्ण शिक्षण ही राज्याची ओळख असली पाहिजे

शिक्षण व्यवस्था बळकट करण्यासाठी राज्यपालांचे कुलगुरूंना आवाहन

भगतसिंह कोश्यारी

शिक्षण व्यवस्था बळकट करण्यासाठी राज्यपालांचे कुलगुरूंना आवाहन

मुंबई : ‘‘राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंनी विचारमंथन करून काही ठोस अशा सूचना कराव्यात. उत्तम विद्यार्थी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण ही आपल्या राज्याची ओळख असली पाहिजे. प्राध्यापकांनी शिक्षण व्यवस्था बळकट करण्यासाठी अधिक समरसतेने योगदान द्यावे. नव्या विद्यापीठ कायद्यासंदर्भात काही अडचणी किंवा सूचना असल्यास त्याबद्दलही कुलगुरूंनी शासनाला कळवावे,’’ असे आवाहन नवनियुक्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. राज्यातील विविध विद्यापीठांच्या कु लगुरूंसमवेत बुधवारी राजभवन येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे व सचिव सौरभ विजय उपस्थित होते. ‘‘राज्यात नॅककडून ‘अ’ दर्जा मिळालेल्या महाविद्यालयांची संख्या ही ३५० आहे, तर ७३ महाविद्यालये स्वायत्त आहेत. उचच शिक्षणाच्या गुणवत्तावाढीसाठी विद्यापीठ कायद्यात विद्यार्थीकेंद्री निर्णयांचा समावेश करण्यात आला. राज्यातील कानाकोपऱ्यात शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी समूह विद्यापीठ आणि स्वायत्त विद्यापीठांना चालना देण्यात आली,’ अशी माहिती विनोद तावडे यांनी राज्यपालांना दिली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थ काणे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे,  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कु लगुरू डॉ. नितीन करमळकर, कवी कुलगुरू संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वराखेडी, मुंबई विद्यापीठाचे आणि डॉ. होमी भाभा समूह विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू, इत्यादी या बैठकीला उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2019 4:46 am

Web Title: quality education should by identiy of the state bhagat singh koshyari zws 70
Next Stories
1 ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘वर्क व्हिसा’ मिळणार
2 अश्लील वर्तन करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक
3 आचारसंहितेआधी रेल्वे प्रकल्पांची लगबग
Just Now!
X