21 September 2020

News Flash

विमानाने मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला विलगीकरण बंधनकारक -महापौर

प्रत्येक प्रवाशाला पालिकेच्या सुधारित आदेशांनुसार १४ दिवस विलगीकरणात राहावेच लागेल.

मुंबई : विमानाने मुंबईत दाखल होणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला पालिकेच्या सुधारित आदेशांनुसार १४ दिवस विलगीकरणात राहावेच लागेल. सर्वासाठी नियम समान आहे. त्यातून सूट हवी असल्यास सरकारी अधिकाऱ्यांनी अर्ज करावा, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोणाचेही नाव न घेता स्पष्ट केले.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईत आलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला विलगीकरणात ठेवण्यात आल्यामुळे विरोधकांनी सत्ताधारी शिवसेना आणि पालिका प्रशासनावर तोफ डागण्यास सुरुवात केली होती. या संदर्भात विचारले असता किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, पालिकेने जारी केलेल्या सुधारित नियमानुसार विमानाने मुंबईत येणाऱ्यांना सक्तीने विलगीकरणात ठेवावे लागणार आहे. या प्रवाशांना पालिकेने सुविधा उपलब्ध केलेल्या ठिकाणी किंवा स्वत:च्या घरी १४ दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. विलगीकरणाच्या नियमातून सरकारी अधिकाऱ्यांना सूट हवी असल्यास दोन दिवस आधी अर्ज करावा लागेल, असेही त्या म्हणाल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2020 2:52 am

Web Title: quarantine is mandatory for everyone arriving in mumbai by air says mayor zws 70
Next Stories
1 अतिवृष्टीनंतर किनारपट्टी रस्त्याच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह
2 शोविक चक्रवर्तीची चौकशी
3 Coronavirus : मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी ८९ दिवसांवर
Just Now!
X