News Flash

स्वस्त धान्यासाठी रांगा

चेंबूरमध्ये सामाजिक अंतराकडे दुर्लक्ष

चेंबूरमध्ये सामाजिक अंतराकडे दुर्लक्ष

मुंबई : शहरात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना याबाबत नागरिक गंभीर नसल्याचे चित्र आहे. चेंबूरमधील अनेक स्वस्त धान्य दुकानांबाहेर बुधवारी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यात सामाजिक अंतराचे भानही राखले जात नव्हते.

पालिकेच्या एम पश्चिम विभागात मोडणाऱ्या चेंबूर परिसरात मंगळवापर्यंत करोनाचे ६२ रुग्ण आढळून आले आहेत. पीएल लोखंडे मार्ग, सिद्धार्थ कॉलनी आणि लाल डोंगर या मोठय़ा झोपडपट्टीत करोनाने शिरकाव केला आहे. मात्र अद्यापही या परिसरातील नागरिक या आजाराबाबत गंभीर नाहीत. या तिन्ही झोपडपट्टींबरोबरच विजय नगर, साठे नगर आणि खारदेव नगर या परिसरात अजूनही अनेक जण वारंवार घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे या ठिकाणी करोनाने शिरकाव केल्यास, मोठय़ा प्रमाणात प्रसार होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.  मात्र भाजी, धान्य आणि इतर काही तरी कारण सांगत या परिसरात अनेक जण घराबाहेर पडतच आहेत.

बुधवारी चेंबूरमधील अनेक स्वस्त धान्य दुकानांवर मोफत तांदूळ देण्यात येत होते. रेशनकार्डवर असलेल्या व्यक्तींच्या नोंदीप्रमाणे प्रति व्यक्ती ५ किलो तांदूळ मोफत मिळत होते. त्यामुळे अनेक स्वस्त धान्य दुकानांबाहेर सकाळी ७ वाजल्यापासून नागरिकांनी मोठय़ा रांगा लावल्या होत्या. मात्र या ठिकाणी नागरिकांकडून कुठेही सामाजिक अंतर पाळलेले पाहायला मिळत नव्हते. अनेक महिला एकमेकींच्या जवळ रांगेत उभ्या होत्या. दुकानदारांकडूनदेखील या महिलांना कुठल्याही सूचना देण्यात येत नव्हत्या. त्यामुळे अशा ठिकाणी करोनाचा प्रसार होण्याची शक्यता अधिक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 1:23 am

Web Title: queue for cheap grain ignoring social distance in chembur zws 70
Next Stories
1 तीव्र मानसिक आजारांचे रुग्ण अडचणीत
2 करोनाविरोधात मुंबई-पुण्यावर लक्ष
3 ‘समाजमाध्यमांवरील चुकीच्या माहितीप्रकरणी कारवाई योग्यच’
Just Now!
X