राज कपूर यांच्यापासून सुरू झालेल्या आर. के. स्टुडिओतील गणेशोत्सवाच्या ७० वर्षांच्या परंपरेला यावर्षी पूर्णविराम लागणार आहे. कारण आर. के. स्टुडिओ कपूर कुटुंबीयांनी विकण्याचा निर्णय घेतला आहे. या स्टुडिओच्या अखेरच्या गणपतीची वाजतगाजत मिरवणूक निघाली असून कपूर कुटुंबीयांतील अभिनेता रणबीर कपूर आणि राजीव कपूर यांनी मिरवणुकीला हजेरी लावली आहे. खरंतर दरवर्षी गणेशोत्सवात कपूर खानदान, आर. के.च्या चित्रपटांचे तंत्रज्ञ, स्टुडिओतील कामगार असे तीनही घटक एकत्र येतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपलं स्टारपण बाजूला ठेवून आर. के. स्टुडिओच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत कपूर कुटुंबीय सामील होतात, झांजा वाजवतात, एखादा ठेका पकडतात, गणपती बाप्पा मोरया म्हणतात. पण आता स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतल्याने हे सर्व चित्र यावर्षी अखेरचं दिसत आहे.

आर. के. स्टुडिओच्या गणपतीशी अनेकांचं जवळचं नातं आहे. दरवर्षी इथं अनेकजण गणपतीच्या दर्शनाला येतात. त्याचसोबत कपूर कुटुंबीयांची एक झलक पाहण्यासाठीही ते उत्सुक असतात. आता आर. के. स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतल्याने बॉलिवूडसह चित्रपटप्रेमीदेखील भावुक झाले आहेत.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: R k studio ganapati visarjan 2018 ranbir kapoor and rajiv kapoor
First published on: 23-09-2018 at 15:48 IST