News Flash

राधे माँची पुन्हा चौकशी

स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू राधे माँची बुधवारी दुपारी कांदिवली पोलिसांनी पुन्हा चौकशी केली. या वेळी पोलिसांनी राधे माँला २३ प्रश्न विचारण्यात आले.

| August 20, 2015 01:35 am

स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू राधे माँची बुधवारी दुपारी कांदिवली पोलिसांनी पुन्हा चौकशी केली. या वेळी पोलिसांनी राधे माँला २३ प्रश्न विचारण्यात आले.
निक्की गुप्ता या विवाहितेचा हुंडय़ासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात गुप्ताच्या सासरच्या मंडळीसह राधे माँवर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी तिला उच्च न्यायालयाने हंगामी जामीन देताना दर बुधवारी कांदिवली पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राधे माँ पोलीस ठाण्यात आली. पोलीस चौकशीत प्रामुख्याने डॅडी नावाने ओळखल्या जाणाऱ्या तिच्या पतीबद्दलचे प्रश्न होते. डॅडी कोण आहे, या कामात डॅडींचा काय संबंध आहे हे पोलिसांनी विचारले. या शिवाय निक्की गुप्ताकडे कधी पैशांची, महागडय़ा दागिन्यांची मागणी केली होती का, असेही विचारण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2015 1:35 am

Web Title: radhe maa inquiry again
टॅग : Radhe Maa
Next Stories
1 दाऊदच्या घराबाहेरील गोळीबारप्रकरणी आरोपींना जन्मठेप
2 नाटककार प्र. ल. मयेकर यांचे निधन
3 ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराविरोधातील याचिका फेटाळली; १० हजारांचा दंड ठोठावला
Just Now!
X