रेडिओ सिटी ९१.१ एफएमकडून नुकतीच ‘रेडिओ सिटी फ्रिडम अॅवॉर्ड’सच्या तिसऱ्या पर्वाची घोषणा करण्यात आली. या माध्यमातून विविध शैली आणि भाषेतील संगीत कला जोपासणाऱ्या कलाकारांचा गौरव करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कलाकारांनी प्लॅनेट रेडिओ सिटीच्या संकेतस्थळावर त्यांच्या संगीतरचना पाठवाव्यात. ११ विविध प्रकारात या प्रवेशिका मागविण्यात आल्या असून त्यामध्ये हिप-हॉप रॅप कलाकार, बेस्ट लोककला फ्युजन कलाकार, बेस्ट पॉप कलाकार, बेस्ट रॉक, बेस्ट मेटल, बेस्ट इलेक्ट्रोनिका, बेस्ट व्हिडिओ, बेस्ट अल्बम कला, बेस्ट युवा भारतीय कलाकार\बॅन्ड, वर्षातील बेस्ट भारतीय वाद्यमेळ आणि यंदाच्या वर्षातील जिनीयस प्रकारांचा समावेश आहे. ही स्पर्धा आसामी, मल्याळम, बंगाली, पंजाबी, तमीळ भाषेतील कलाकारदेखील या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेच्या अंतिम सोहळ्याचे प्रक्षेपण एनडीटीव्ही प्राईम वाहिनीवर प्रसारित करण्यात येणार आहे.