News Flash

VIDEO: राहुलने प्रत्युषाचा छळ करून तिला संपवले; प्रत्युषाच्या आईचा आरोप

राहुलने माझ्या मुलीचा खूप छळ केला आणि सरतेशेवटी तिला संपविले.

Pratyusha Banerjee : मी राहुलशी मैत्री करून आयुष्यात खूप पस्तावलेय, यातून बाहेर पडण्याचा मार्ग मी शोधतेय, असे प्रत्युषाने काही दिवसांपूर्वी फोनवरून मला सांगितले होते.

टेलिव्हिजन अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिची आई सोमा बॅनर्जी यांनी राहुल राज सिंग याने आपल्या मुलीचा छळ करून तिला संपवल्याचा आरोप केला आहे. राहुल सुटता कामा नये. माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. माझ्या मुलीला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी मी संपूर्ण देशाकडे करते. राहुलने माझ्या मुलीचा खूप छळ केला आणि सरतेशेवटी तिला संपविले, असे सोमा बॅनर्जी यांनी मुंबईत पार पडलेल्या प्रत्युषाच्या शोकसभेदरम्यान सांगितले. राहुलला कोणत्याप्रकारची शिक्षा झाली पाहिजे असे विचारले असता, त्याला आयुष्यभर तुरूंगात ठेवून यातना भोगायला लावल्या पाहिजेत, अशी संतप्त प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
मी राहुलशी मैत्री करून आयुष्यात खूप पस्तावलेय, यातून बाहेर पडण्याचा मार्ग मी शोधतेय, असे प्रत्युषाने काही दिवसांपूर्वी फोनवरून मला सांगितले होते. खंबीर असलेल्या माझ्या मुलीच्या आत्महत्येला राहुलच जबाबदार असल्याचे सांगत प्रत्युषाची आई सोमा बॅनर्जी यांनी राहुलविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी राहुलविरोधात प्रत्युषाला आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याने मंगळवारी उशिरापर्यंत त्याला अटक झाली नाही.
‘राहुलशी मैत्री केल्याचा पश्चाताप!’
शुक्रवार, १ एप्रिलला गोरेगाव, मोतीलालनगर येथील घरात प्रत्युषाने गळफास घेऊन आत्महत्या केली. बांगूरनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष भंडारे आणि पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्य़ाचा तपास सुरू आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2016 10:02 am

Web Title: rahul raj singh tortured my daughter he should suffer in jail for life says pratyusha banerjee mother
Next Stories
1 भुजबळ कुटुंबिय कर्जबुडव्यांच्या यादीत; नाशिक आणि मुंबईतील मालमत्तेवर जप्तीची कारवाई
2 Video : आता गारेगार लोकल प्रवास
3 नव्या लोकलच्या खर्चाने मध्य रेल्वे ‘घामाघूम’!
Just Now!
X