22 September 2020

News Flash

गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वेगाडी सोडा!

मुंबई, ठाण्यातील कोकण प्रवासी संघटनांची व्हॉट्सअ‍ॅप मोहीम

संग्रहित छायाचित्र

मुंबई, ठाण्यातील कोकण प्रवासी संघटनांची व्हॉट्सअ‍ॅप मोहीम

मुंबई : परराज्यात जाणाऱ्या कामगारांसाठी मोफत रेल्वेगाडय़ा सोडणाऱ्या सरकारने गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठीही विशेष रेल्वेगाडी सोडण्याची मागणी मुंबई, ठाण्यातील कोकण प्रवासी संघटनांनी करत व्हॉट्सअ‍ॅप मोहीम सुरू के ली आहे. काळ्या रंगाचे कपडे परिधान करून, नाव, पत्ता इत्यादी माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवण्याचे आवाहन संघटनांनी के ले आहे. ही सर्व माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका आठवडय़ानंतर पाठवण्यात येणार आहे.

करोनामुळे गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. अद्याप कोकणासाठी एसटी किं वा रेल्वे सोडण्याबाबत आणि त्याच्या नियोजनाविषयी काहीच माहिती शासनाने दिलेली नाही. कोकणातील काही गावांतील ग्रामपंचायतींकडून गणेशोत्सवानिमित्त गावात आल्यास १४ दिवस अलगीकरणात राहण्याचा नियम चाकरमान्यांसाठी आखण्यात आला आहे. त्यामुळे आणखीनच पंचाईत झाली आहे. एसटी सोडल्यास त्या प्रासंगिक करारावर चौपट भाडे आकारून नको, तर मूळ भाडे आकारून एसटी सोडण्याची मागणी आहे.

कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाचे प्रमुख राजू कांबळे यांनी मुंबई, ठाणे जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणात कोकणवासीय राहात असल्याचे सांगितले. खासगी वाहनांचे दर अवाच्या सवा असल्याचे टाळेबंदीतही दिसून आले. गणेशोत्सवातही तेच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणात झटपट व स्वस्त प्रवासासाठी रेल्वे हाच पर्याय असून विशेष गाडी सोडण्याची मागणी शासनाकडे करत आहे. यासाठी व्हॉट्सअ‍ॅपमार्फत विशेष मोहीम सुरू के ली असून सर्व प्रवासी संघटना यात सामील आहेत.

काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेले छायाचित्र, पूर्ण नाव, सध्या राहण्याचे ठिकाण, तालुका लिहून संघटनेच्या ७०२१९१६१५१ किं वा ०८९७६०२०७९३ या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर पाठवण्याचे आवाहन केल्याचे कांबळे म्हणाले. वसई-सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव यशवंत जडय़ार यांनी आठवडाभर ही मोहीम सुरू राहणार असल्याचे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 4:16 am

Web Title: rail passengers association demand for special trains to konkan during ganeshotsav zws 70
Next Stories
1 बोरिवलीतील स्वयंपुनर्विकास प्रकल्प मार्गी लागणार
2 वांद्रे पश्चिममध्ये जनजागृतीसाठी डॉक्टरांची मदत
3 चाहत्यांचा आकडा फुगवून घेणाऱ्यांवर नजर
Just Now!
X