10 December 2017

News Flash

चेन्नई एक्स्प्रेसमुळे अंबरनाथमध्ये प्रवाशांचे रेलरोको

या आंदोलनामुळे काहीवेळ उपनगरीय रेल्वेगाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला

मुंबई | Updated: September 11, 2015 10:59 AM

संग्रहित छायाचित्र

मुंबईकडे येणारी चेन्नई एक्स्प्रेस अंबरनाथ स्थानकामध्ये सायडिंगला लावल्याने रेल्वे प्रवाशांनी शुक्रवारी सकाळी अचानकपणे रेलरोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे काहीवेळ उपनगरीय रेल्वेगाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला.
सकाळी गर्दीच्यावेळी मुंबईच्या दिशेने येण्यासाठी उपनगरीय गाड्यांना प्राधान्य दिले जाते. अशावेळी आधीपासून विलंबाने धावत असलेली एखादी लांब पल्ल्याची एक्स्प्रेस गाडी मुंबईच्या दिशेन जात असल्यास तिला थांबवून ठेवण्यात येते. उपनगरीय गाड्यांना मार्ग मोकळा करून देण्यासाठी या गाड्यांना गरजेप्रमाणे वेगवेगळ्या स्थानकात सायडिंगला लावले जाते. अंबरनाथमध्ये स्थानकाच्या अलीकडे चेन्नई एक्स्प्रेस थांबवण्यात आली. मात्र, त्यामुळे मागून येणाऱया उपनगरीय गाडीला विलंब झाल्याने संतापलेल्या प्रवाशांना रेलरोको आंदोलन केले. उपनगरीय गाड्यांना आधी सोडा आणि मग एक्स्प्रेस गाड्यांना सोडण्यात यावे, अशी मागणी रेल्वे प्रवाशांकडून करण्यात आली.

First Published on September 11, 2015 10:59 am

Web Title: rail roko at ambarnath station