डहाणूमध्ये प्रवाशांनी रेल रोको करत जवळपास २० मिनिटांसाठी वाहतूक रोखून धरली होती. अरावली एक्स्प्रेसची वाहतूक डहाणू स्थानकापर्यंत करण्यात आल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी ट्रॅकवर उतरत रेल रोकोला सुरुवात केली. पुढे पाणी भरल्याचं कारण देत एक्स्प्रेसची वाहतूक डहाणू स्थानकापर्यंत करण्यात आली होती. संतप्त प्रवाशांनी रेल रोकोला सुरुवात करत मुंबईला येणारी वलसाड एक्स्प्रेस रोखून धरली होती. अखेर रेल्वेने एक्स्प्रेस बोरिवलीपर्यंतत सोडण्याचं मान्य केल्यानंतर प्रवाशांनी रेल रोको मागे घेतला.
First Published on July 12, 2018 7:25 am