News Flash

मुंबईत शॉर्टसर्किटमुळे लोकलच्या दोन डब्यांना आग; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

अग्निशामकच्या ४ गाड्या घटनास्थळी

आग लागलेल्या लोकलचे डबे

सीएसएमटीवरुन ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकलच्या दोन डब्यांना अचानक आग लागल्याने लोकल दादर स्थानकांत थांबवण्यात आली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशामकच्या ४ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्यात आली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे प्राथमिक माहितीतून कळते. या आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, धीम्या गतीच्या मार्गावरील लोकल जलद गतीच्या मार्गावरुन वळवण्यात आल्या आहेत.

ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या ९.२२च्या लोकलमधून अचानक धूर येताना दिसल्यामुळे लोकल दादर स्थानकावरील फलाट क्रमांक १ वर गाडी थांबवण्यात आली. त्यामुळे या फलाटावरील वाहतूक बंद करण्यात आली. त्यामागून येणाऱ्या टिटवाळा, बदलापूर, डोंबिवली लोकलचा त्यामुळे खोळंबा झाला होता. अग्निशामकच्या चार गाड्यांनी ही आग विझवली. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2018 10:39 pm

Web Title: rail traffic affected after fire broke out inside part of a local train at dadar railway station the fire has now been doused
Next Stories
1 भीमा कोरेगाव हिंसाचार : हायकोर्टाने मिलिंद एकबोटेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला
2 मुंबईकरांवर करभार नाही मात्र आरोग्य सेवा महागणार
3 BMC Budget: मुंबई महापालिकेच्या ३५ शाळांचे खासगीकरण
Just Now!
X