News Flash

रेलज्ञान

रेल्वे गाडय़ांद्वारे दररोज कापले जाणारे अंतर पृथ्वी आणि चंद्रामधील अंतराच्या साडेतीन पट आहे.

* देशातील १४,३०० रेल्वे गाडय़ांद्वारे दररोज कापले जाणारे अंतर पृथ्वी आणि चंद्रामधील अंतराच्या साडेतीन पट आहे.
* देशातील पहिली रेल्वे- मुंबई आणि ठाणेदरम्यान १६ एप्रिल १८५३ रोजी धावली. भारतीय रेल्वेच्या मार्गाची एकूण लांबी- ६३,०२८ किमी.
* एकूण कर्मचारी संख्या (रोजगार उपलब्ध)- १.५५ दशलक्ष दररोज १३ दशलक्ष प्रवासी आणि १.३ दशलक्ष टन मालाची ने-

आण स्टेशनांची संख्या – सुमारे ७०००

* जगातील सर्वात मोठा फलाट- खरगपूर- २७३३ फूट लांब. सोन नदीवरूल नेहरू सेतू सर्वात मोठा रेल्वे पूल
* स्वातंत्र्यपूर्व काळात देशात ४२ वेगवेगळ्या रेल्वे कंपन्या कार्यरत होत्या.
* चित्तरंजन येथे विद्युतशक्तीवर चालणारी इंजिने निर्मितीचा कारखाना. चेन्नई, कपूरथळा आणि बंगळुरू येथे डबे बनवण्याचे कारखाने
* नवी दिल्ली येथे १९७७ साली राष्ट्रीय रेल्वे संग्रहालयाची स्थापना. तिन्ही गेजच्या रेल्वे असणारे देशातील एकमेव स्टेशन- सिलिगुडी
* पहिला रेल्वे पूल- दापुरी व्हायाडक्ट मुंबई-ठाणे मार्गावरील. पहिला बोगदा- पारसिक बोगदा
* पहिला रेल्वे घाट रस्ता- थळ आणि बोर घाट. पहिली भूमिगत रेल्वे- कोलकाता मेट्रो
* पहिली संगणकीकृत आरक्षण प्रणाली- नवी दिल्ली- १९८६ साली सुरुवात. पहिली विद्युत रेल्वे- ३ फेब्रुवारी १९२५ रोजी मुंबई व्हीटी ते कुर्ला दरम्यान धावली.
* प्रसाधनगृहांची सुविधा- १८९१ मध्ये प्रथम दर्जाच्या डब्यांत, ०७ साली खालच्या वर्गाच्या डब्यांत
* स्थानकाचे सर्वात लहान नाव- आयबी- ओदिशा. – सर्वात मोठय़ा नावाचे स्थानक- श्री वेंकटनर सिम्हा राजूपरियपेटा (तामिळनाडू)
* सर्वात व्यस्त (बिझी) स्टेशन- लखनऊ- रोज ६४ रेल्वे. सर्वात कमी लांबीचा मार्ग- नागपूर ते अजनी- ३ किमी
* दररोज चालणारी सर्वात लांब मार्गावरील रेल्वे- केरळ एक्स्प्रेस- ४२.५ तासांत ३०५४ किमी.
* विनाथांबा सर्वात जास्त कापले जाणारे अंतर- त्रिवेंद्रम राजधानी- ६.५ तासांत ५२८ किमी
* सर्वात लांब बोगदा- कोकण रेल्वेवरील मंकी हिल ते खंडाळा दरम्यान ६.५ किमीचा करबुडे बोगदा
* सर्वात जुने जतन केलेले इंजिन- फेरी क्वीन १८५५- अद्याप वापरता येण्याजोगे.
* देशातील सर्वाधिक वेगवान रेल्वे- भोपाळ शताब्दी- १४० किमी प्रति तास
* सर्वाधिक थांबे असलेली रेल्वे- हावडा-अमृतसर एक्स्प्रेस- ११५ थांबे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2016 2:46 am

Web Title: railway budget 2016 railway budgetrailway budget 2016 10
Next Stories
1 आश्वासनपूर्ती संथगतीने..
2 पेट्रोल-डिझेलवरील विशेष अधिभार रद्द करा
3 ..तर शिवस्मारकाला स्थगिती!
Just Now!
X