मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी मध्य रेल्वे १५ मार्चपासून ११ जादा फेऱ्या सुरू करणार आहे. गेल्या महिन्यात मध्य रेल्वेने हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर २९ फेऱ्या वाढवल्या होत्या. त्याचाच पुढील भाग म्हणून या ११ सेवा वाढवण्यात येणार आहेत.गेल्या दोन वर्षांपासून मध्य रेल्वेवर एकही सेवा वाढवण्यात आली नव्हती. मात्र भावेश नकाते प्रकरणानंतर रेल्वे अपघात कमी करण्यासाठी स्थापन झालेल्या खासदारांच्या समितीने तातडीच्या उपाययोजना करण्यावर भर दिला. त्यातूनच हार्बर, ट्रान्स हार्बर आणि मुख्य मार्गावर एकूण ४१ सेवा वाढवण्याची योजना पुढे आली.
हार्बर मार्गावर सात, ट्रान्स हार्बर मार्गावर २२ सेवा वाढवल्या. या सेवा २६ जानेवारीपासून सुरू झाल्या असून या २९ सेवांमुळे प्रवाशांचा त्रास काही प्रमाणात कमी झाला आहे. आता मुख्य मार्गावरही ११ सेवा वाढवण्यात येणार आहेत

‘उन्नत रेल्वेमार्गाचा मेट्रोवर परिणाम नाही’
मुंबई : छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेल आणि चर्चगेट-विरार अशा दोन्ही उन्नत रेल्वेमार्ग हे मुंबईच्या एकात्मिक वाहतूक व्यवस्थेसाठी आवश्यक आहेत. उन्नत रेल्वेमार्गाचा मेट्रो वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात अनेक मुद्दय़ांवर उन्नत रेल्वेमार्गाला विरोध करण्यात आला होता. पण राज्य सरकारने आपली भूमिका बदलून आता या मार्गाला पूर्ण पाठिंबा दिला आहे.उन्नत रेल्वेमार्गासाठी सुमारे १२ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च येणार असून चार ते पाच वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे