कल्याण-विठ्ठलवाडीदरम्यान रेल्वे रूळाला तडा गेल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे अंबरनाथ, बदलापूर आणि कर्जतकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाला. कल्याण-विठ्ठलवाडीदरम्यान, डाऊन दक्षिण पूर्व मार्गावर रेल्वे रूळाला तडा गेला. त्यामुळे एक गाडी विठ्ठलवाडी स्टेशनात थांबवण्यात आली आहे. तडा गेल्यामुळे डाऊन मार्गावरील अंबरनाथ, बदलापूर कर्जतकडे जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 25, 2019 9:46 am