News Flash

रेल्वे सेवा ठप्प

मुसळधार पाऊस आणि रुळांवर साचलेल्या पाण्यामुळे शुक्र वारी मध्य रेल्वे मुख्य आणि हार्बर उपनगरीय सेवेची पुरती दैना उडाली.

मध्य रेल्वेवर कुर्ला, विद्याविहार, शीव, चुनाभट्टी स्थानकांत रुळावर पाणी

मुंबई : मुसळधार पाऊस आणि रुळांवर साचलेल्या पाण्यामुळे शुक्र वारी मध्य रेल्वे मुख्य आणि हार्बर उपनगरीय सेवेची पुरती दैना उडाली. एकामागोमाग एक थांबलेल्या लोकल, रुळांवरून उतरून जवळचे स्थानक गाठणारे प्रवासी असेच चित्र उपनगरीय रेल्वे मार्गावर दिसत होते. पश्चिम रेल्वेवर पाणी साचले नसले तरीही लोकलही काहीशा विलंबानेच धावत होत्या. मध्य रेल्वेवरील लोकलचे वेळापत्रकच विस्कळीत झाल्याने कळवा ते घाटकोपरदरम्यानच्या प्रवासाला चार तास लागत होते.

कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, चेंबूर परिसरात गुरुवारी मध्यरात्रीपासून शुक्रवारी दुपारी १२ पर्यंत १६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे कुर्ला, विद्याविहार, शीव, चुनाभट्टी स्थानकांत हळूहळू पाणी साचण्यास सुरुवात झाली. परिणामी, सकाळी ८.३० च्या सुमारास मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते कल्याण, कर्जत, कसारा दरम्यानच्या लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने धावू लागल्या, तर सीएसएमटी ते पनवेल हार्बरवरही तीच परिस्थिती होती. शुक्रवारी सकाळी कार्यालय गाठण्यासाठी घराबाहेर पडलेल्या अनेकांची त्रेधातिरपीट उडाली. लोकलचा वेग मंदावला. घाटकोपर ते ठाणेपर्यंत अप मार्गावर येणाऱ्या लोकलच्या रांगा लागल्या होत्या, तर कु र्ला ते सीएसएमटी हार्बरवरही लोकल एकामागोमाग उभ्या होत्या. हळूहळू पुढे सरकणाऱ्या लोकल नंतर बराच वेळ एकाच जागी उभ्या राहात असल्याने प्रवासी लोकलमधून उतरून रुळावरून चालतच पुढील स्थानक गाठत होते. यामुळे महिला प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. सकाळी १०.३० वाजता कु र्ला, शीव, विद्याविहार स्थानकाजवळ रुळांवर खूपच पाणी साचल्याने मुलुंड ते माटुंगा जलद मार्गावर लोकल सेवा बंदच ठेवण्यात आली होती. त्यामुळे सर्व भार धिम्या लोकलवर अाला आणि अनेक स्थानकांत प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली, परंतु या लोकलही एकाच जागी खोळंबल्याने प्रवाशांचे हाल झाले.

स्थानकात अडकलेले प्रवासी कार्यालयात जाण्यासाठी पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा शोध घेत होते. बदलापूर, अंबरनाथ, कल्याण येथून सीएसएमटीला जाण्यास बराच विलंब होत असल्याचा अंदाज घेत अनेकांनी मधल्या स्थानकात उतरून पुन्हा घरी जाणे पसंत के ले. सकाळी सव्वाआठच्या सुमारास कळव्याहून घाटकोपपर्यंतच्या लोकल प्रवासासाठी तब्बल चार तास मोजावे लागले. चुनाभट्टी स्थानकात साचलेल्या पाण्यामुळे वडाळा ते मानखुर्द लोकल सेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे हार्बर मार्गावरील रेल्वे सेवेचा पुरता बोजवारा उडाला होता.

माहिती मिळत नसल्याने प्रवाशांचा गोंधळ

मध्य रेल्वे मुख्य मार्गावरील रुळांवर साचलेल्या पाण्यामुळे लोकल पुढे सरकू  शकत नव्हत्या. परंतु याची माहिती लोकल डब्यातील प्रवाशांना मोटरमन किं वा गार्डकडून दिली जात नव्हती. त्यामुळे प्रवाशांना पुढील स्थिती समजत नव्हती. काही प्रवासी रुळावर उतरून जवळचे स्थानक गाठत होते. याविरोधात प्रवाशांनी रेल्वेच्या ट्विटरवर नाराजी व्यक्त केली.

सकाळी १०.३० ते सकाळी ११.१५- कु र्ला, शीव, विद्याविहार स्थानकांत रुळावर साचलेल्या पाण्यामुळे माटुंगा ते मुलुंडदरम्यान जलद लोकल सेवा रद्द

सकाळी ११.१० ते दुपारी १२- चुनाभट्टी स्थानकातील रुळावर साचलेल्या पाण्यामुळे वडाळा ते मानखुर्ददरम्यान लोकल रद्द

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2021 12:43 am

Web Title: railway mumbai rain heavy rain stop railway central railway mumbai ssh 93
Next Stories
1 नदीपात्रात भराव, भिंती बांधल्याने पूरस्थिती
2 विशेष श्रेणीतील उत्तीर्णाचे प्रमाण कायम
3 ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे निधन
Just Now!
X