News Flash

कर्करुग्णांसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

‘तुमचे दहा रुपये एका चिमुकल्याचा जीव वाचवू शकतात.. या मुलाला रक्ताचा कर्करोग झाला

रेल्वे सुरक्षा दलाची विशेष मोहीम
‘तुमचे दहा रुपये एका चिमुकल्याचा जीव वाचवू शकतात.. या मुलाला रक्ताचा कर्करोग झाला असून त्याच्या उपचारांसाठी साडेतीन लाख रुपयांची गरज आहे. त्याला मदत करा..’ दर दिवशीच्या लोकलच्या प्रवासात हातात एक फाइल घेऊन त्यात लहान मुलाचा फोटो, काही वैद्यकीय कागदपत्रे, वैद्यकीय चाचणी अहवाल आदी गोष्टी कोंबून मदत मागणाऱ्या तरुणांची मुंबईकरांना सवय झाली आहे. मात्र अनेकदा हे कर्करुग्ण बनावट असून त्यांच्यासाठी पैसे मागणाऱ्या संस्थाही बनावट असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता रेल्वे सुरक्षा दलाने असे पैसे मागणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी सुरू केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून लोकलच्या डब्यांत दुपारच्या वेळी मोठी फाइल आणि हातात दानपेटी घेऊन फिरणाऱ्या तरुण-तरुणींची संख्या वाढली आहे. चार ते पाच वर्षांच्या लहान लहान कर्करोगग्रस्त मुलांसाठी मदत मागणाऱ्या या तरुण-तरुणींच्या दानपेटीत १० रुपयांपासून ५० आणि १०० रुपयांच्या नोटाही पडतात. मात्र या तरुणांकडे अधिकृत कागदपत्रे नसून हे तरुण-तरुणी अनधिकृतपणे मदत गोळा करत असल्याच्या तक्रारी रेल्वे सुरक्षा दलाला मिळाल्याचे मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनी सांगितले.
या तरुणांवर कारवाई करून रेल्वे सुरक्षा दलाने १९ जणांना ताब्यात घेतले होते. त्यांची अधिक चौकशी केली असता हे तरुण ज्यांच्यासाठी पैसे गोळा करत होते, ते कर्करुग्ण नसल्याचे निष्पन्न झाले होते. तसेच ज्या संस्थेच्या नावाखाली पैसे गोळा केले जात होते, त्या संस्थाही बनावट असल्याचे रेल्वे सुरक्षा दलाला आढळले होते. या ‘संस्था’ दर दिवशी २००-३०० रुपयांच्या मेहेनतान्यावर तरुणांना कामाला लावतात. महाविद्यालयीन तरुण-तरुणी पैसे मागत असल्याने प्रवाशांनाही विश्वास बसतो आणि सढळ हस्ते नोटा दानपेटीत पडतात. एकदा कारवाई करूनही पुन्हा हे ‘दानसत्र’ चालू असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाला प्राप्त झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा रेल्वे सुरक्षा दलातर्फे मोठी मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे भालोदे यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपासून लोकलच्या डब्यांत दुपारच्या वेळी मोठी फाइल आणि हातात दानपेटी घेऊन फिरणाऱ्या तरुण-तरुणींची संख्या वाढली आहे. मात्र या तरुणांकडे अधिकृत कागदपत्रे नसून हे तरुण-तरुणी अनधिकृतपणे मदत गोळा करत असल्याच्या तक्रारी रेल्वे सुरक्षा दलाकडे आल्या आहेत.
– सचिन भालोदे,
विभागीय सुरक्षा आयुक्त (मध्य रेल्वे)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2016 2:17 am

Web Title: railway protection force special mission
Next Stories
1 LIVE : बदलता महाराष्ट्र – “कर्ती आणि करविती”
2 पुण्याचा अर्षद अतार आणि राहुरीचा विजय रहाणे ‘ब्लॉग बेंचर्स’चे विजेते
3 ..मायदेशी मात्र उपेक्षाच
Just Now!
X