News Flash

डॉ. आंबेडकरांचे बॅनर उतरवल्याने दिव्यात रेल रोको

दिवा रेल्वे स्थानकालगतच्या मार्गावर उभारण्यात आलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बॅनर शुक्रवारी सकाळी रेल्वे सुरक्षा दलाने उतरविल्याने संतप्त अनुयायांनी या मार्गावरील धीमी वाहतूक तब्बल दीड तास

| December 7, 2013 02:11 am

दिवा रेल्वे स्थानकालगतच्या मार्गावर उभारण्यात आलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बॅनर शुक्रवारी सकाळी रेल्वे सुरक्षा दलाने उतरविल्याने संतप्त अनुयायांनी या मार्गावरील धीमी वाहतूक तब्बल दीड तास रोखून धरली.
दादरच्या चैत्यभूमीकडे निघालेल्या दिव्यातील अनुयायांनी हे बॅनर उतरविणाऱ्या सुरक्षा दलाच्या जवानांसोबत वाद घातला. त्यामुळे दिवा स्थानकात तणाव निर्माण झाला होता.  या आंदोलनामुळे सकाळच्या वेळेत धीम्या मार्गावरील वाहतूक खोळंबल्याने १० लोकल रद्द कराव्या लागल्या. परिणामी अनेक प्रवाशांचे मोठय़ा प्रमाणावर हाल झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2013 2:11 am

Web Title: railway roko protest in diva because babasaheb ambedkar banners takes down
Next Stories
1 मेधा गाडगीळ, श्रीवास्तव अतिरिक्त मुख्य सचिवपदी
2 नाकाबंदी परीक्षेत काही उत्तीर्ण, काही अनुत्तीर्ण
3 सराफाच्या दुकानात लूट
Just Now!
X