पश्चिम रेल्वे मार्गावरील माटुंगा ते माहीम या दोन स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. धीम्या मार्गावरील रुळाला तडे गेल्याने अप मार्गावरची वाहतूक ऐन गर्दीच्या वेळी विस्कळीत झाली आहे. धीम्या मार्गावरची वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली आहे.

धीम्या मार्गावरील रेल्वे रुळाला तडे गेल्याने अप मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो आहे. माटुंगा, प्रभादेवी, लोअर परळ, महालक्ष्मी या स्थानकांवर लोकल काही काळासाठी न थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरात लवकर दुरुस्ती करुन पश्चिम रेल्वेची वाहतूक ट्रॅकवर आणण्यासाठी प्रयत्न होत आहेत.