26 October 2020

News Flash

रेल्वेच्या ३५ पुलांची पाहणी पूर्ण

भायखळा, करी रोड, चिंचपोकळी आणि घाटकोपर या चार पुलांचे काम सुचवले होते.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : मध्य रेल्वेवरील अत्यंत जुन्या ३५ पादचारी आणि उड्डाणपुलांच्या सुरक्षा पाहणीनंतर सात पुलांचा वापर बंद केला गेला आहे, तीन पुलांची दुरुस्ती झाली आहे, तर एका पुलाची दुरुस्ती सुरू आहे. १२ पुलांची किरकोळ दुरुस्ती लवकर होणार आहे. मुंबईच्या आयआयटीने ही पाहणी केली.

भायखळा, करी रोड, चिंचपोकळी आणि घाटकोपर या चार पुलांचे काम सुचवले होते. त्यात घाटकोपरच्या पुलाखाली अतिरिक्त पादचारी रस्ता काढला असून करी रोड आणि चिंचपोकळी येथील वाहतुकीसाठी वापरत असलेल्या पुलांवर डांबराचा अतिरिक्त थर दिल्याने त्याच्यावरील वजन वाढले आहे. महापालिकेशी समन्वय साधून अतिरिक्त थर काढून त्यावर आयआयटीने सुचवल्या प्रमाणे आवश्यक तेवढेच डांबरीकरण केले जाण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी भाजपचे शहर अध्यक्ष आशीष शेलार यांच्याशी झालेल्या चर्चेत ही माहिती दिली. रेल्वे पुलांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी शेलार यांनी त्यांची भेट घेतली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2019 2:17 am

Web Title: railways complete survey of 35 bridges
Next Stories
1 शरद पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक
2 ‘सदोष खुबारोपण प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे द्या’
3 पश्चिम रेल्वेमार्गावर आज, तर मध्य मार्गावर उद्या मेगाब्लॉक
Just Now!
X