News Flash

पावसाने सरासरी ओलांडली

ऑगस्टच्या पहिल्या दिवसाचा अपवाद वगळल्यास गेल्या दहा दिवसात पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र जून, जुलैमध्ये पावसाने केलेल्या तगडय़ा कामगिरीमुळे

| August 12, 2013 03:25 am

ऑगस्टच्या पहिल्या दिवसाचा अपवाद वगळल्यास गेल्या दहा दिवसात पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र जून, जुलैमध्ये पावसाने केलेल्या तगडय़ा कामगिरीमुळे कुलाबा येथील पावसाची सरासरी ओलांडली आहे. सांताक्रूझ येथेही एकूण सरासरीच्या ८७ टक्के पाऊस झाला आहे.
श्रावणातील उन-पावसाचा खेळ सध्या सुरू झाला आहे. ११ ऑगस्टपर्यंत कुलाबा येथे ११९ मि.मी. तर सांताक्रूझ येथे ११५ मि.मी. पावसाची नोंद झाली. १ ऑगस्ट रोजी कुलाबा येथे झालेल्या ७० मि.मी., तर सांताक्रूझ येथील ९२ मि.मी. पावसाव्यतिरिक्त इतर दिवशी मात्र पावसाने केवळ हजेरी लावण्यापेक्षा जास्त कामगिरी केली नाही. पुढील तीन दिवसही पावसाचा जोर वाढणार नाही. मुंबई आणि आसपासच्या परिसरात पावसाच्या हलक्या एक-दोन सरी येतील, असा अंदाज मुंबई हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
१९६१ ते १९९० या ३० वर्षांतील जून ते सप्टेंबरमधील पावसाची आकडेवारी पाहता कुलाब्यात सरासरी १९२० मि.मी. पाऊस पडतो. यंदा ११ ऑगस्टपर्यंत कुलाब्यात १९४९ मि.मी. पाऊस झाला. सांताक्रूझ येथेही २१३८ मि.मी. पाऊस पडला असून तो सरासरीच्या ८७ टक्के आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2013 3:25 am

Web Title: rain crossed average
टॅग : Mumbai Rain
Next Stories
1 पीपल्सच्या वादात प्राध्यापकांचे वेतन रखडले
2 गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे रुग्णालयातून घरी
3 देशातील पायाभूत सुविधा क्षेत्रात ३० लाख कुशल मनुष्यबळाची चणचण
Just Now!
X