News Flash

मुंबईत हलक्या ते मध्यम सरी

पुढील ३ दिवस मुंबई, ठाणे, पालघर येथे मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मुंबई : मुंबईत मंगळवारी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. रात्री ८.३० वाजेपर्यंत राम मंदिर येथे ७८ मिमी असा २४ तासांचा सर्वाधिक पाऊस नोंदवला गेला. कु लाबा येथे कमाल तापमान ३१ अंश तर किमान तापमान २५.५ मिमी नोंदवले गेले. तसेच सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३१.१ आणि कि मान तापमान २५.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पुढील ३ दिवस मुंबई, ठाणे, पालघर येथे मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रायगड, रत्नागिरी येथे पुढील २ दिवस तीव्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

कोकण, घाटमाध्यावर पुढील तीन दिवस पावसाचे

पुणे : महाराष्ट्र आणि कर्नाटक किनापट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून तो पुढील तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. गेल्या २४ तासात कोकणात मुसळधार, मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मुंबई आणि ठाणे परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद करण्यात आली. रत्नागिरी जिल्हा, नाशिक जिल्ह्याचा पश्चिम पट्टा, तर पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळत आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2021 1:34 am

Web Title: rain fall in mumbai akp 94
Next Stories
1 रायगडमध्ये पुरात ८ जणांचा बळी?
2 मिठागरांच्या जमिनीवर घरे बांधण्याच्या प्रक्रियेला गती
3 ‘कोव्हॅक्सिन’ची मात्रा  घेण्यास नागरिक अनुत्सुक