News Flash

मुंबईमध्ये पावसाची दमदार हजेरी, लंडनवरून आलेलं विमान अहमदाबादला वळवलं

पहाटेपासूनच विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे.

संग्रहित

दक्षिण मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पहाटेपासूनच विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे. अंधेरी, मालाड, कांदिवली, दहिसरमध्ये पाऊस पडत आहे. यासोबतच कांजूरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर आणि मुलुंडमध्येही पावसाने हजेरी लावली आहे. चर्चगेट आणि सीएसटीला पहाटे विजांच्या कडकडाटात जोरात पाऊस सुरु झाला होता. मुसळधार पावसाचा परिणाम हवाई वाहतुकीवर झाला आहे. लंडनवरून मुंबईला आलेलं जेट एअरवेजचं विमान अहमदाबादला वळवण्यात आलं आहे.

सोमवारी मुंबईत जोरदार पाऊस पडल्यानंतर पाऊस गायब झाला होता. दोन दिवस मुंबईकर उकाड्याने हैराण झाले होते. आज पडत असलेल्या पावसामुळे मुंबईकरांना थोडा दिलासा मिळेल. दरम्यान ८ ते १० जून दरम्यान मुंबईत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आठवड्याच्या शेवटी म्हणजेच ८ ते १० जून दरम्यान मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता स्कायमेटने वर्तविली आहे. मुंबईमध्ये मुसळधार पाऊस आल्यावर रेल्वे सेवा विस्कळीत होण्याची शक्यता असते. ही परिस्थिती पाहता नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे.

सोमवारी मुंबईत पहिला पाऊस पडला. पहिल्याच पावसात ४२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले होते. रस्त्यांवरही ट्रॅफीक जॅम झाले होते. त्याचप्रमाणे आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या तीन दिवसांमध्ये पडणारा पाऊस खूप जास्त असल्याने तो याआधीच्या पावसाचे विक्रम मोडण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. पावसादरम्यान नागरिकांनी समुद्राच्या पाण्यात जाणे टाळावे. तसेच शक्य असल्यास घरात थांबल्यास जास्त चांगले असेही सांगण्यात येत आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात पसरेल. यंदा २००५ प्रमाणे पूरस्थिती उद्भवणार असल्याचे म्हटले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2018 7:11 am

Web Title: rain in mumbai 5
Next Stories
1 मुख्यमंत्र्यांविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार
2 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला उच्च न्यायालयाची चपराक
3 भाजप सरकार मस्तवाल! – शरद पवार
Just Now!
X