News Flash

Mumbai monsoon updates: अतिपावसामुळे मुंबई तुंबली; महापालिकेचे स्पष्टीकरण

मोसमी वारे पुढे सरकण्यासाठी हवामान सध्या अनुकूल असून शनिवारी मोसमी पाऊस मुंबई, ठाणे आणि राज्याच्या काही भागांमध्ये दाखल झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली.

( संग्रहीत छायाचित्र )

Mumbai monsoon updates: मोसमी पाऊस शनिवारी मुंबईत दाखल झाला असून मुंबई, ठाणे आणि राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनचे आगमन झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. शनिवारी सकाळपासून मुंबई आणि उपनगराला मुसळधार पावसाने झोडपल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर पावसामुळे हिंदमाता, परळ या भागांमध्ये पाणी साचल्याने या भागातील रस्ते वाहतूक मंदावली. शनिवारी सकाळपासून परळ, हिंदमाता आणि धारावी येथे १०० मिमी पावसाची नोंद झाली त्यामुळेच पाणी साचले, असे सांगत मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा पावसाकडे बोट दाखवले आहे.

केरळमध्ये २९ मे रोजी पोहोचलेला मोसमी पाऊस ८ जून रोजी महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पोहोचला. मोसमी वारे पुढे सरकण्यासाठी हवामान सध्या अनुकूल असून शनिवारी मोसमी पाऊस मुंबई, ठाणे आणि राज्याच्या काही भागांमध्ये दाखल झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली. राज्यातील उर्वरित भागांमध्ये सोमवारपर्यंत मोसमी वारे पोहोचतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

जाणून घ्या मुंबईतील पावसाच्या अपडेट्स Mumbai monsoon updates

> नवी मुंबईत मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी झाड पडल्याच्या १५ घटना

> अंधेरीतील जुहू लेन येथे झाड पडल्याने रस्ते वाहतूक विस्कळीत, कोणीही जखमी नाही.

Photos : मुंबापुरीची झाली तुंबापुरी!

> पावसामुळे सीप्झ ते ईस्टर्न एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी

> ठाण्यातील घोडबंदर रोड येथे पावसामुळे समोरुन येणाऱ्या ट्रकचा अंदाज न आल्याने दुचाकीचा अपघात, तरुणीचा मृत्यू.

> मुसळधार पावसामुळे परळ परिसरात पाणी साचले.

छाया सौजन्य: निर्मल हरिंद्रन

> पावसामुळे भायखळा पोलीस ठाण्यात पाणीच पाणी;  साचलेल्या पाण्यातही पोलीस कर्मचारी सेवेसाठी सदैव तत्पर.

छाया सौजन्य: गणेश शिर्सेकर

> खराब हवामानाचा फटका  विमान सेवेलाही बसला. मुंबईत येणाऱ्या दोन विमानांचे मार्ग बदलण्यात आले.

> पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत. मध्य रेल्वेवरील वाहतूक सुमारे २० मिनिटे उशिराने.

> मुंबईत शुक्रवारी रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली. शनिवारी सकाळी काही वेळेसाठी पावसाने विश्रांती घेतली.

पुढील २४ तासांमध्ये मुंबई आणि उपनगरातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून दुपारनंतर पावसाचा जोर वाढेल, असे हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2018 11:56 am

Web Title: rain updates imd says monsoon arrived in mumbai thane flights diverted central railway train delayed
Next Stories
1 ..अन् ‘दस का दम’च्या सेटवर अनिल कपूरने मागितली जाहीर माफी
2 मिस्टर परफेक्शनिस्टवर का आली ट्रोल होण्याची वेळ ?
3 सहाव्या शतकांतील लेणींमध्ये आयता घरोबा!
Just Now!
X