News Flash

मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

मान्सूनचे आगमन होण्यापूर्वी हवेत वाढलेल्या प्रचंड बाष्पामुळे पावसाच्या तुरळक सरी येतात.

उन्हाचे चटके आणि घामाच्या धारांमध्ये कावलेल्या मुंबईकरांना पुढील आठवडाभर अधूनमधून पावसाच्या तुरळक सरींच्या शिडकाव्याचा गारवा मिळण्याचा अंदाज आहे. बुधवारपासून पुढील तीन दिवस सरींची संख्या वाढणार असली तरी पूर्ण शहरभर हा पाऊस पडणार नसून काही भागात या सरी येतील. यामुळे तापमानात फारशी घट अपेक्षित नाही. बुधवार ते शुक्रवारदरम्यान मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात विजेच्या कडकडाटासह पावसाच्या सरी येतील.

मान्सूनचे आगमन होण्यापूर्वी हवेत वाढलेल्या प्रचंड बाष्पामुळे पावसाच्या तुरळक सरी येतात. यावेळीही हवामानाची स्थिती या सरींसाठी अनुकूल आहे. अरबी समुद्रात मध्यभागी चक्रीवादळसदृश स्थिती आहे. त्याचवेळी पश्चिम किनारपट्टीवर हलकासा कमी दाबाचा पट्टा आहे. त्यामुळे समुद्रावरील बाष्पयुक्त वारे किनाऱ्यावर येत आहेत. केरळ व कर्नाटकच्या किनारपट्टीवर त्यामुळे जोरदार सरी येण्याची शक्यता आहे. त्याचा थोडाफार प्रभाव महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरही दिसेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2016 3:27 am

Web Title: rainfall estimation in marathwada and central maharashtra
Next Stories
1 शासकीय अर्थसहाय्यात ‘झोपु’ योजनेतील दहा विकासकांना रस!
2 दाम्पत्याला मारहाण; चौकशीचे आदेश
3 अनधिकृत बांधकामांविरोधात ऑनलाइन तक्रार शक्य
Just Now!
X