जवळपास दोनशे आसने पाण्यात, सहा ते आठ लाखांचे नुकसान

मुंबई : करोनामुळे गेली सहा महिने बंद असलेल्या नाटय़गृहांनी कोटय़वधींचे नुकसान सहन केले आहे. त्यात मंगळवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाने परळ येथील दामोदर नाटय़गृहात प्रवेश केला आणि नाटय़गृहाचा निम्म्याहून अधिक भाग पाण्याखाली गेला. प्रथमदर्शनी तरी नाटय़गृहाला सहा ते आठ लाखांचा फटका बसला असल्याची माहिती व्यवस्थापकांनी दिली.

nashik water crisis marathi news,
नाशिक जिल्ह्यात तहानलेल्या गावांच्या संख्येत वाढ, आठवडाभरात ५७ गावे-वाड्यांची भर; धरणसाठा २८ टक्क्यांवर
Water reserves in the country at 35 percent Where is the worst situation
देशातील पाणीसाठा ३५ टक्क्यांवर… कुठे आहे सर्वाधिक बिकट स्थिती?
drowned
नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन जणांचा बुडून मृत्यू
Nashik, Two Die, Separate incident, Well Accidents, Baglan Taluka, marathi news,
नाशिक : बागलाण तालुक्यात विहिरीत पडून दोघांचा मृत्यू

नाटकासोबातच तमाशा, लावणी, आणि लोककलेची अभिजात परंपरा जपणाऱ्या परळ येथील दामोदर नाटय़गृहाला करोनानंतर पावसानेही आर्थिक संकटात टाकले आहे. मंगळवारी रात्री जोर धरलेल्या पावसाने बुधवारी सकाळी दादर, परळ, हिंदमाता परिसरात बरेच पाणी साचले. दामोदर नाटय़गृह प्रभादेवी स्थानकापासून आलेल्या उतारावर असल्याने इथे अधिक पाणी साचले आणि नाटय़गृहात शिरले. पाण्याचा ओघ इतका होता की काही तासांतच अध्र्याहून अधिक नाटय़गृह पाण्याखाली गेले. एका रांगेत बत्तीस आसनांची रचना आहे अशा आठ ते नऊ रांगा पूर्णत: पाण्यात बुडाल्या. यात दोनशेहून अधिक आसनांचे नुकसान झाले. नाटय़गृहालगत असलेल्या ध्वनीयंत्रणेला काहीसे पाणी लागल्याने त्याच्याही दुरुस्तीचा खर्च निघू शकतो अशी माहिती द्वारपालांनी दिली. ‘नाटय़गृह उताराला आहे. दोन मोटार लावून पाणी बाहेर काढण्याचे काम सुरू असूनही पाण्याची पातळी कमी झाली नाही,’ अशी माहिती नाटय़गृहाचे शशिकांत भारती यांनी दिली.

सहा महिन्यांत झालेले नुकसान न भरून काढण्यासारखे आहे. झालेल्या नुकसानाचा अंदाज आता बांधता येणार नाही. पण सहा ते आठ लाखांपर्यंत खर्च येऊ  शकतो.        

– सुभाष माळवदे. व्यवस्थापक, दामोदर नाटय़गृह