पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी टीका केली असली, तरी मोदी यांचे कौतुकही राज ठाकरे यांनी केले होते हा इतिहास आहे. देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली तर आगामी काळात मनसेसह युतीबाबत भाजप विचार करू शकतो, असे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
मनसेचा मेळावा २३ जानेवारी रोजी होत असून राज ठाकरे हे हिंदुत्वाची भूमिका आक्रमकपणे मांडतील असे संकेत आहेत. त्या पाश्र्वभूमीवर मनसे व भाजपची संभाव्य युती आणि राज ठाकरे यांनी अलीकडच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेली टीका याबाबत मुनगंटीवार यांना माध्यमांनी विचारले असता, देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास असल्याची भूमिका राज ठाकरे यांनी घेतली तर मनसेशी युती करण्याबाबत विचार होऊ शकतो, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 12, 2020 12:37 am