News Flash

राज कुंद्रांनी मुंबई पोलिसांना दिली २५ लाखांची लाच; कारण आलं समोर… ACB ला आलेल्या Email मुळे खळबळ

राज कुंद्रा यांना पोर्नोग्राफी प्रकरणात सोमवारी रात्री मुंबई पोलिसांनी अटक केली आहे

शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना पोर्नोग्राफी प्रकरणात सोमवारी रात्री मुंबई पोलिसांनी अटक केली. कुंद्रा यांना गुरुवारी दुपारी पुन्हा वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात आणण्यात आले होते. दरम्यान, याप्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी राज यांच्याकडून २५ लाखांची लाच घेतल्याच्या आरोपांचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मेल आला आहे. राज कुंद्रा सध्या २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत आहे.

अँटी करप्शन ब्युरो (एसीबी)ला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात राज कुंद्रा यांच्यासोबत असलेला आरोपी यश ठाकूर याचे ई-मेल प्राप्त झाले आहेत. या मेलमध्ये त्यांनी शिल्पा शेट्टी यांचे पती आणि व्यापारी राज कुंद्रा यांनी अटक टाळण्यासाठी मुंबई पोलिस अधिकाऱ्यांना २५ लाखांची लाच दिल्याचे आरोप केले आहेत. पॉर्न फिल्म प्रकरणातील फरार आरोपी यश ठाकूर यांनी दावा केला आहे की पोलिसांनी राज कुंद्राला यापूर्वीच अटक केली असती.

पोलिसांनीही माझ्याकडूनही लाच मागितली होती, असा दावा यश ठाकूर यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी यावर्षी मार्च महिन्यात महाराष्ट्र अँटी करप्शन ब्युरोला ईमेल लिहून तक्रार केली होती, तसेच मला अटक होण्यापासून वाचविण्यासाठी माझ्याकडून २५ लाखांची लाच मागितल्याचा आरोप त्यांनी केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एप्रिलमध्ये हे मेल मुंबई पोलिस आयुक्तांकडे पाठवले होते आणि या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले होते. यश ठाकूर यांच्याविरूद्ध पॉर्न फिल्म प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार आहे.

पूनम पांडे आणि राज कुंद्रातील नेमका वाद काय?; पूनमला का यायचे रात्री-अपरात्री फोन?

राज कुंद्राच्या अटकेनंतर मुंबई पोलिसांना बरेच महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत. मात्र, पोलीस अद्याप तपास करत आहेत. मुंबई पोलिसांशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, राज कुंद्राच नव्हे तर इतरही अनेक लोक पोर्न इंडस्ट्रीत सहभागी होते. पोलिसांच्या चौकशीत अशी अनेक नावे समोर आली आहेत, ज्यांना अद्याप ताब्यात घेण्यात आलेले नाही.

मुंबई गुन्हे शाखेचे म्हणणे आहे की, राज कुंद्रा अश्लील चित्रपट बनविण्यात आणि काही अ‍ॅप्सच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात गुंतला होता. या ते कामातून लाखो कोटी रुपये कमवायचे. या अ‍ॅपचे नाव हॉटशॉट्स अ‍ॅप आहे. ज्यावर अश्लील चित्रपट पोस्ट केले गेले. यासाठी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपदेखील तयार करण्यात आला होता, ज्यामध्ये दररोजच्या कमाई व तोट्याता हिशोब ठेवला जात असे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2021 5:44 pm

Web Title: raj kundra had given rs 25 lakh to mumbai police excitement due to the email received by acb abn 97
Next Stories
1 मुंबईत दरड कोसळून ३२ नागरिकांचा बळी; पालिका प्रशासनाच्या निषेधार्थ भाजपाकडून सभा तहकुबीचा प्रस्ताव
2 मुंबईत लक्झरी घरं खरेदी-विक्रीत वाढ; गेल्या सहा महिन्यात इतक्या कोटींची उलाढाल
3 “आता मुंबईकर सविनय कायदेभंग करतील”, भाजपाचा ठाकरे सरकारला इशारा!
Just Now!
X