मुंबई जिल्हा न्यायालयाने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांना २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र न्यायालयाने सुनावलेली पोलीस कोठडी ही कायदेशीर नसल्याचं सांगत राज कुंद्रा यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये या सुनावणीविरोधात याचिका दाखल केलीय. आपल्याला बेकायदेशीपणे पोलिसांनी ताब्यात ठेवल्याचं राज कुंद्रा यांनी याचिकेमध्ये म्हटल्याचं ‘बेंच अ‍ॅण्ड बार’ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. विशेष म्हणजे आपल्याला करोना संसर्गाचं कारण देत कुंद्रा यांनी कोठडीमध्ये वाढ करण्यात येऊ नये असं आपल्या याचिकेत म्हटलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की वाचा >> पतीच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी पहिल्यांदाच झाली व्यक्त; Instagram वर पोस्ट करत म्हणाली…

आज मुंबई जिल्हा न्यायालयाने राज कुंद्रा आणि त्यांचे सहकारी रायन तोरपे यांना २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई पोलिसांनी आज जिल्हा न्यायालयासमोर कुंद्रा आणि तोरपे यांना हजर केलं. त्यावेळी मुंबई पोलिसांनी सात दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली. ऑनलाइन बेटींगमध्ये पॉर्नोग्राफीतून मिळवलेला पैसा वापरण्यात आल्याची शक्यात व्यक्त करत मुंबई पोलिसांनी अधिक तपासासाठी सात दिवसांची कोठडी द्यावी अशी विनती केली होती. न्यायालयाने त्यानुसार या दोघांना चार दिवसांच्या पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र आता या आदेशाला कुंद्रा यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं आहे.

नक्की पाहा >> कंडक्टरचा मुलगा, हिरे व्यापारी, शिल्पा शेट्टीशी लग्न ते पॉर्न प्रकरण; राज कुंद्रांबद्दलच्या ३० खास गोष्टी

कुंद्रा यांनी परिनाम लॉ असोसिएट्सच्या माध्यमातून याचिका दाखल केली असून ज्या कलमांखाली अपल्याला अटक करण्यात आलीय त्यामध्ये जास्तीत जास्त सात वर्षांची शिक्षा होऊ शकते असाही उल्लेख केलाय. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा दाखला देत आपल्याला असाप्रकारे कायदा आणि नियमांचे पालन न करता पोलीस कोठडीत ठेवणे हे पूर्णपणे चुकीचे असल्याचे या याचिकेत म्हटलं आहे. कुंद्रा यांनी करोनाचेही कारण या याचिकेमध्ये दिलं आहे. भारताच्या सरन्यायाधिशांनी एका निकालादरम्यान तुरुंगामध्ये करोनाचा संसर्ग होऊ शकतो असं निरिक्षण नोंदवलं होतं त्याचा दाखला कुंद्रा यांनी दिलाय. असं ‘बेंच अ‍ॅण्ड बार’ने म्हटलं आहे.

पोलिसांनी कशासाठी मागितलीय कोठडी?

राज कुंद्रांच्या यस बँक खात्यावरुन युनायटेड बँक ऑफ आफ्रिकेतील खात्यावर किती पैसे वळवण्यात आले यासंदर्भातील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी न्यायालयाने सांगितलं. याच तपासासाठी पोलिसांना आता न्यायालयाने चार दिवसांचा कालावधी दिला असून २८ जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

नक्की वाचा >> अटकेनंतर राज कुंद्रांनी पहिल्यांदाच न्यायालयासमोर मांडली भूमिका, म्हणाले, “तो कंटेट पॉर्न नाही तर…”

कार्यालयावर छाप्यात सापडला बराच डेटा

मुंबई पोलिसांनी यापूर्वीच अंधेरी पश्चिमेमध्ये असणाऱ्या राज कुंद्रांच्या वियान कंपनीच्या कार्यालयामध्ये छापा टाकून तेथून मोठ्याप्रमाणात डिजीटल पुरावे ताब्यात घेतले आहेत. या छाप्यामध्ये तपास यंत्रणांना बऱ्याच मोठ्याप्रमाणात माहिती आणि साहित्य सापडलं आहे. हा डेटा काही टेराबाईट्समध्ये आहे यावरुनच या छाप्यामध्ये पोलिसांना तपासासाठी आवश्यक असणारे पुढील धागेदोरे सापडल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी कारवाई करण्याआधीच मोठ्या प्रमाणामध्ये डेटा डिलीटही करण्यात आला असून आता गुन्हे शाखेकडून फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने डेटा रिकव्हरीचा प्रयत्न केला जात आहे.

तपासात सहकार्य नाही…

राज कुंद्रांवर एवढे गंभीर आरोप लावण्यात आलेले असतानाही ते तपासामध्ये सहकार्य करत नसल्याचं सांगितलं जात आहे. तपासादरम्यान कुंद्रा हे सहयोग करत नसल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. अनेक प्रश्नांना उत्तर देण्यास कुंद्रा टाळाटाळ करत आहेत. तसेच ते सतत त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळत आहे. मी कोणताही अश्लील चित्रपट बनवलेला नाही असं ते वारंवार सांगत आहेत. मात्र राज कुंद्रांविरोधात गुन्हे शाखेकडे सबळ पुरावे असल्याचं पोलिसांनी अधिक स्पष्ट केलं आहे. कुंद्रा यांना भायखळ्यातील तुरुंगात ठेवण्यात आलंय.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj kundra moves bombay high court challenging police remand in porn film case scsg
First published on: 23-07-2021 at 16:53 IST