News Flash

…तुम्ही नाही बसायचं त्यांच्या पंगतीला – राज ठाकरेंचे मोदी-पवार भेटीवर टीकास्त्र

बारामतीमध्ये जाऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

| February 16, 2015 10:27 am

बारामतीमध्ये जाऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. व्यंगचित्राच्या माध्यमातून त्यांनी मराठी माणसाला ‘त्यांच्या’ पंगतीला न बसण्याचा सल्लाही दिला आहे.
महिन्याला दोन-तीन वेळा पवारांशी चर्चा- नरेंद्र मोदी
बारामती येथील कृषी विकास प्रतिष्ठानच्या भाजीपाला गुणवत्ता केंद्राच्या उदघाटनासाठी आणि इतर कार्यक्रमांसाठी मोदी गेल्या शनिवारी बारामती दौऱयावर आले होते. त्यावेळी त्यांनी पवारांचे तोंडभरून कौतुक केले. दर महिन्याला किमान दोन-तीनदा आमच्यात चर्चा होत असते, असे सांगत त्यांनी पवारांचे कौतुक केले. या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी व्यंगचित्र रेखाटले आहे. त्यामध्ये पवार आणि मोदी एकमेकांना घास भरवत असल्याचे चित्र असून, त्यामध्ये मराठी जनता भोळीभाबडी आणि विसरभोळी असल्याचे सांगत त्यांनी मोदी आणि पवारांच्या पंगतीला बसू नये, असा सल्लाही दिला आहे.
मोदी, पवार यांचा बारामतीत व्हॅलेंटाइन डे!
pawar-modi-cartoon

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 16, 2015 10:27 am

Web Title: raj thackeray criticized modi meets pawar in baramati
टॅग : Raj Thackeray
Next Stories
1 व्हिडिओ – ‘आबांच्या निधनाने राजकारणातील साधेपणा अधिक दुर्मिळ होईल’
2 आर.आर. यांच्यासारखा हजरजबाबी नेता आजपर्यंत बघितला नाही- मुख्यमंत्री
3 महाराष्ट्राचे आबा गेले
Just Now!
X