News Flash

आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणपतीच्या दर्शनाला राज ठाकरे

राज ठाकरेंनी घेतले बाप्पाचे आशीर्वाद

भाजपाचे नेते आणि शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. त्यांनी गणपतीचे दर्शन घेतले. लोकसभा निवडणुकीच्या आधी राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात झालेला वाद सर्वश्रुत आहे. तरीही सगळे काही विसरुन राज ठाकरे यांनी आशिष शेलार यांच्या गणेशोत्सव मंडळाला भेट दिली आणि दर्शन घेतले.

‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी आणि अमित शाह यांना हटवा असे आवाहन त्यांच्या दहा सभांमधून केले होते. राज ठाकरे यांच्या लाव रे तो व्हिडिओला बघाच तो व्हिडिओ असे उत्तरही आशिष शेलार यांनी दिले होते. एवढंच नाही तर जून मध्ये जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात जेव्हा आशिष शेलार गेले होते त्याच कार्यक्रमात राज ठाकरेंनीही हजेरी लावली होती. मात्र राज ठाकरेंना पाहताच आशिष शेलार यांनी तिथून काढता पाय घेतला होता. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर एकेकाळी खूप चांगले मित्र असलेल्या राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यातील दुरावाही पाहण्यास मिळाला. मात्र काही वेळापूर्वी राज ठाकरे यांनी आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. सोमवारी आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणपतीचे दर्शन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही घेतले होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 3, 2019 5:23 pm

Web Title: raj thackeray darshan of ganesha in ashish shelars sarvjanik mandal mumbai scj 81
Next Stories
1 पाहा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती
2 दलित असल्याने महिला आमदाराला गणेश मंडपात प्रवेश नाकारला
3 बाप्पासाठी हटके ‘नैवेद्य’!
Just Now!
X