News Flash

राज ठाकरे यांना नोटीस मिळालीच नाही

वाशीतील कार्यकर्ता मेळाव्यात टोलसंदर्भात प्रक्षोभक भाषण केल्या प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

| December 13, 2014 02:40 am

वाशीतील कार्यकर्ता मेळाव्यात टोलसंदर्भात प्रक्षोभक भाषण केल्या प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी त्यांच्या विरोधात न्यायालयात चार्ज शीट दाखल करण्यात येत असल्याने वाशी पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली होती. मात्र ही नोटीस त्यांच्यापर्यंत न पोहोचल्याने ते न्यायालयात हजर झाले नसल्याचे मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. जानेवारी २०१४ मध्ये वाशीतील मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनासाठी राज ठाकरे आले होते. या वेळी विष्णुदास भावे नाटय़गृहात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना ‘टोल भरू नका, कोणी समोर आले तर त्याला आडवे करा’ असे विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर राज्यभरात मनसे कार्यकर्त्यांनी टोलविरोधात आंदोलन करत तोडफोड केली होती. यासंदर्भात वाशी पोलिसांतर्फे न्यायालयात शुक्रवारी आरोपपत्र दाखल करण्यात येणार होते. या वेळी राज यांना न्यायालयात आपली बाजू मांडण्यासाठी दुपारी १२ वाजता उपस्थित राहण्याची नोटीस ५ सप्टेंबर रोजी स्पीड पोस्टाद्वारे पाठवण्यात आली होती. यासंदर्भात वाशी पोलिसांशी संपर्क साधला असता  राज यांना पाठवलेली नोटीस त्यांना मिळाली आहे किंवा नाही याबाबत अद्याप माहिती उपलब्ध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 13, 2014 2:40 am

Web Title: raj thackeray did not receive notice from washi police
टॅग : Raj Thackeray
Next Stories
1 पॅकेजेस् उदंड, तरीही शेतकरी कासावीसच!
2 राष्ट्रपती, पंतप्रधान, सोनियांकडून पवारांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा
3 चौकशीचे भवितव्य भाजपच्या हाती
Just Now!
X