News Flash

सत्ता आहे म्हणून दुरुपयोग करु नका, राज ठाकरेंनी भाजपाला सुनावलं

भाजपाची सुद्धा वेळ येणार आहे, सत्ता गेल्यावर त्यांचीही चौकशी होणार असं राज ठाकरे बोलले आहेत

कर्नाटकमधे सत्ता स्थापना करण्यासाठी भाजपा, काँग्रेस आणि जेडीएसमध्ये रस्सीखेच सुरु असून यावेळी बाजी नेमकी कोण मारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. एकीकडे भाजपाने राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी वेळ मागितला असताना, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कर्नाटकचे राज्यपाल भाजपच्याच बाजूने जाणार असं म्हटलं आहे.

कर्नाटकमध्ये सर्वाधिक जागा मिळाल्यामुळे सत्ता स्थापन करण्याचा पहिला अधिकार आपलाच असल्याचा दावा भाजपाने केला असला तरी, काँग्रेसने जनता दल (धर्मनिरपेक्ष) या पक्षाशी निवडणुकोत्तर आघाडी करुन बहुमताचा आकडा गाठल्याने नव्या आघाडीलाच सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली पाहिजे असा प्रतिदावा केला आहे.

दरम्यान एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, राज ठाकरे यांनी कर्नाटकमधील परिस्थितीवर भाष्य करताना, कर्नाटकचे राज्यपाल हे भाजपाच्याच बाजूने जाणार, पण सत्ता आहे म्हणून भाजपाने दुरुपयोग करु नये अशी टीका केली आहे. भाजपाची सुद्धा वेळ येणार आहे, सत्ता गेल्यावर त्यांचीही चौकशी होणार असंही ते बोलले आहेत.

दोन्ही पक्षांनी सत्तास्थापनेसाठी राज्यपालांची मंगळवारी भेट घेतली. कर्नाटकमधील त्रिशंकू परिस्थितीमुळे आता सत्ता स्थापनेच्या दोऱ्या राज्यपाल बजूबाई वाला यांच्या हाती गेल्या आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासाठी आमदार पद सोडणारे वजूभाई वाला सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या भाजपाला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याची संधी देतात की, काँग्रेस-जनता दलाच्या नव्या आघाडीला सत्ता स्थापनेचे आमंत्रण देतात हे पुढील दोन दिवसांत ठरण्याची शक्यता आहे. निकालानंतर भाजपा १०४ जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी सत्तास्थापनेसाठी आवश्यक ११२ जागांचे पाठबळ मिळवण्यात तो अपयशी ठरला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2018 12:47 pm

Web Title: raj thackeray says governor will be buyest in karnataka
Next Stories
1 कर्नाटकमध्ये मायावती ठरल्या युतीच्या शिल्पकार, असा केला भाजपाचा गेम
2 मेट्रो स्थानकावर खाल्लं बर्गर , पोटात गेलं प्लास्टिक तर गळ्याला झाली इजा
3 कर्नाटकात नवे नाट्य, जेडीएसचे दोन आमदार गायब
Just Now!
X