News Flash

‘मोदीमुक्त भारत’ जरा जास्तच झाले, राज ठाकरेंनी स्तर पाहून बोलावे – आशिष शेलार

ज्यांना महाराष्ट्रातील जनतेने रोजगारमुक्त केलं, त्यांनी ‘मोदीमुक्त भारता’ची मुक्ताफळे उधळली आहेत

भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेली ‘मोदीमुक्त भारत’ची हाक भाजपा नेत्यांच्या जिव्हारी लागली असून त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. ‘मोदीमुक्त भारत’ हे जरा जास्तच झाले, राज ठाकरेंनी आपला स्तर पाहून बोलावे अशी प्रतिक्रिया मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली आहे. ज्यांना महाराष्ट्रातील जनतेने रोजगारमुक्त केलं, त्यांनी ‘मोदीमुक्त भारता’ची मुक्ताफळे उधळली आहेत असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

याआधी राज ठाकरेंच्या भाषणांवर बाळासाहेब ठाकरेंचा प्रभाव दिसायचा, हल्ली शरद पवार यांचा प्रभाव दिसतो असाही टोलाही आशिष शेलार यांनी लगावला आहे.

काय बोलले होते राज ठाकरे –
गुजरात दौऱ्यावर असताना नरेंद्र मोदींनी माझ्यासमोर चांगलं चित्र उभा केलं, मात्र, ते सगळं खोटं होत. आता मोदींचा खरा चेहरा माझ्या समोर आला आहे. भारताला 1947 साली पहिलं स्वातंत्र्य मिळालं, दुसरं स्वातंत्र्य 1977 साली मिळालं आणि आता 2019 साली भारताला तिसऱ्या स्वातंत्र्याची गरज आहे. मोदीमुक्त भारत करा, मोदी मुक्त भारत व्हायला हवा. मोदींच्या परदेश दौऱ्यातून एकही रुपया भारतात आला नाही. मोदी हे केवळ खोटे बोलणारे नेते आहेत. ते जर पुन्हा सत्तेत आले तर देशाची आणखी वाट लागेल. त्यामुळे आता मोदीमुक्त भारतासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे जाहीर आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. ते शिवाजी पार्कवरील मनसेच्या ‘पाडवा मेळाव्या’त बोलत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2018 1:11 pm

Web Title: raj thackeray should stay in limit says ashish shelar
Next Stories
1 प्रकाश आंबेडकरांमुळे महाराष्ट्र पेटला, संभाजी भिडे गुरूजींचा आरोप
2 ४० वर्षांपूर्वी कोणीतरी तंबाखूचं व्यसन करण्यापासून रोखायला हवं होतं – शरद पवार
3 स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या मागण्या तथ्यहीन
Just Now!
X