मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हाताला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली. कृष्णकुंज या राज ठाकरेंच्या निवासस्थानी भारत भालके आले होते. त्यावेळचे फोटो ‘MNS Adhikrut’ ने ट्विट केले आहेत. या ट्विटमधल्या एका फोटोमध्ये राज ठाकरे यांच्या उजव्या हाताला दुखापत झाल्याचे दिसून येते आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टेनिस एल्बो झाला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टेनिस एल्बो झाला आहे. गेल्या महिन्याभरापासून त्यांना हा त्रास होतो आहे. राज ठाकरेंच्या हाताला हा आजार झाल्याचं फोटोंमध्ये स्पष्ट दिसतं आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राज ठाकरे यांनी झंझावाती प्रचार केला. त्यांच्या पक्षाचा एक आमदार निवडून आला. सक्षम विरोधी पक्ष हवा असेल तर मनसेला निवडून द्या असं आवाहन राज ठाकरेंनी केलं होतं. मात्र तसा कौल जनतेने त्यांना दिला नाही. आज राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांनी राज ठाकरेंची सदीच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान पुष्पगुच्छ देऊन राज ठाकरे यांचं स्वागतही केलं.

मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर जे फोटो ट्विट करण्यात आले आहेत त्यातल्या एका फोटोमध्ये राज ठाकरेंना टेनिस एल्बो झाल्याचं दिसतं आहे.

टेनिस एल्बो म्हणजे काय?
आपल्या कोपरापासून महत्त्वाचे स्नायू दंडाच्या दिशेने गेलेले असतात. स्नायूंचा एक संच मनगट उचलण्याचं काम करत असतो. स्नायूंचा उगम कोपराच्या बाह्य दिशेला असतो. हा स्नायूंचा संच उगमस्थानी सुजला तर मनगट उचलण्यासाठी जराशीही हालचाल करणं वेदना देणारं ठरतं. कपडे पिळणं, दरवाजा उघडणं किंवा दरवाजाचा नॉब फिरवणं या साध्या हालचालींमध्येही वेदना होता. कधी-कधी साध्या हस्तांदोलनामुळेही कळ येऊ शकते. टेनिस किंवा बॅडमिंटन खेळ सातत्याने खेळणाऱ्यांना हा त्रास मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. याच त्रासाला टेनिस एल्बो असं म्हणतात.