13 December 2019

News Flash

संकटकाळात निवडणुकांची चर्चा कशाला?

उद्धव ठाकरे यांचा राजना टोला

उद्धव ठाकरे यांचा राजना टोला

सध्या राज्यावर पुराचे संकट असताना निवडणुकांची चर्चा कशाला असा सवाल करत पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

शिवसेनेच्या वतीने कोकण व दक्षिण महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी शिवसेनेची मदत पथके रविवारी रवाना झाली. त्या वेळी उद्धव ठाकरे बोलत होते. सध्याचे पुराचे वातावरण पाहता विधानसभा निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. त्या पाश्र्वभूमीवर संकटकाळात निवडणुकांची चर्चा कशाला, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

या भयावह परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी शिवसेना पूर्ण ताकदीने मदत करत आहे. माणसांसोबतच पशुधनाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी १०० डॉक्टर्सचे पथक शिवसेनेकडून पाठवण्यात आले आहे.

ताबडतोबीने जे काही करता येईल ते सरकारसोबत इतरांनीही करायला पाहिजे. शब्दांच्या खेळात मी पडणार नाही. पण श्रेयाच्या राजकारणाकडे दुर्लक्ष करून मदतीकडे लक्ष केंद्रित करायला हवे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. केवळ सांगली-कोल्हापुरातच नाही तर कोकणातही शिवसेनेने मदत पाठवली असल्याची माहिती ठाकरे यांनी दिली.

First Published on August 12, 2019 12:52 am

Web Title: raj thackeray uddhav thackeray maharashtra floods heavy rainfall mpg 94
Just Now!
X