News Flash

राज ठाकरेंच्या पत्नीला पाळीव कुत्र्याचा चावा; चेह-याला गंभीर दुखापत

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या चेहऱ्याला पाळीव कुत्रा चावल्यामुळे गंभीर दुखापत झाली आहे.

| August 19, 2015 03:24 am

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या चेहऱ्याला पाळीव कुत्रा चावल्यामुळे गंभीर दुखापत झाली आहे. शर्मिला यांच्या चेहऱ्याला ६५ टाके घालण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांतर्फे देण्यात आली आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली होती.
राज यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी जेम्स व बॉन्ड हे दोन पाळीव कुत्रे आहेत. त्यापैकी बॉन्ड या कुत्र्याने शर्मिला ठाकरेंच्या चेहऱ्याचा चावा घेतला. हा घाव इतका खोलवर होता की शर्मिला यांच्या चेहऱ्याच्या हाडालाही दुखापत झाली आहे. सध्या माहीमच्या हिंदुजा रुग्णालयात प्लास्टिक सर्जन डॉ. अनिल टिबरेवाला यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राज ठाकरे यांनी मंगळवारी दुपारी त्यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी पत्रकार परिषद बोलावली होती. त्या पत्रकार परिषदेच्या आधी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. राज यांना लगचेच याची माहिती मिळाली. मात्र, पत्रकार परिषद आधीच ठरलेली असल्यानं ती आटोपून मग ते तातडीने रुग्णालयात गेले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2015 3:24 am

Web Title: raj thackeray wife sharmila beaten by dog
टॅग : Raj Thackeray
Next Stories
1 जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांची तावडेंच्या निवासस्थानी घोषणाबाजी
2 वादावर पडदा टाका!
3 ‘क्रिकेट अकादमी’ऐवजी आलिशान क्लब!
Just Now!
X