News Flash

मनसे वर्धापन दिन : राज ठाकरेंनी गाणं ट्विट करून मनसैनिकांमध्ये भरली ऊर्जा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १४ व्या वर्धापन दिनाची जय्यत तयारी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १४ वा वर्धापन दिन आज (सोमवार) नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाटय़गृहात साजरा होत आहे. यंदा प्रथमच मनसेचा वर्धापनदिन सोहळा मुंबई बाहेर  होत आहे. वाशीमधील विष्णुदास भावे नाट्यगृहात हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत मनसे वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

“अरुणोदय झाला..” हे गाणं व याचबरोबर माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १४ व्या वर्धापन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. असा संदेश ट्विट करून राज ठाकरेंनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

वाशी टोलनाक्यावरून आज सकाळी १० वाजता मनसे नेते अमित ठाकरे यांची रॅली निघणार आहे. तसेच, दुपारी १२ वाजता राज ठाकरे वाशीत दाखल होणार आहेत.  या वेळी  राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार असून महाविकास आघाडी सरकारच्या शंभर दिवसांवर  ते नेमकं काय बोलणार? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

मनसेने आपल्या झेंडय़ाचा रंग बदलेला असून हिंदुत्वाचा मुद्दा आघाडीला आणण्याचा निर्णय घेतलेला आहे. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईत होऊ घातलेली महापालिका निवडणूकही रंगणार असल्याचे दिसत आहे. मनसे या निवडणुकीत सर्व ताकदीनिशी उतरणार असल्याचीही माहिती समोर येत आहे. तसेच, या वर्धापनदिनाच्या सोहळ्यानिमित्त मनसेच्या शॅडो कॅबिनेटची देखील घोषणा होणार असल्याचे बोलले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2020 9:38 am

Web Title: raj thackeray wishes for mns anniversary msr 87
Next Stories
1 सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण
2 Video : तब्बल हजार वर्ष जुन्या माहिमच्या किल्ल्याची दुर्दशा
3 पंचतारांकित शहरांच्या यादीत मुंबईला स्थान नाही?
Just Now!
X