News Flash

गुजरातमध्ये जिंकले कोण आणि हरले कोण?-राज ठाकरेंचे नवे व्यंगचित्र

व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

गुजरात निवडणूक निकालावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्र काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. १, २ आणि ३ असे क्रमांक रेखाटून त्यावर क्रमांक १ वर नरेंद्र मोदी आणि अमित शहा उभे राहिलेले दाखवण्यात आले आहेत. तर क्रमांक २ वर राहुल गांधी दाखवण्यात आले आहेत. मात्र काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची उंची मोदी आणि शहा यांच्यापेक्षा जास्त दाखवण्यात आली आहे. तर इतरांना तिसऱ्या क्रमांकावर स्थान देण्यात आले आहे. ते अगदीच कमकुवत दाखवण्यात आले आहेत.

गुजरात हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बालेकिल्ला आहे. त्या ठिकाणी झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने भाजपला काँटे की टक्कर दिली हे सगळ्या देशाने पाहिलेच. अशात आता राज ठाकरे यांनीही राहुल गांधी यांचे महत्त्व गुजरातमुळे वाढल्याचे त्यांच्या व्यंगचित्रातून दाखवले आहे. गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला १५० जागा मिळतील अशी सिंह गर्जना अमित शहा यांनी केली होती. मात्र प्रत्यक्षात भाजपला ९९ जागा मिळाल्या. तर काँग्रेसनेही ८० च्यावर जागा मिळवत भाजपला दे धक्का काय असतो हा अनुभव दिला. याच निवडणूक निकालावर भाष्य करणारे व्यंगचित्र आता राज ठाकरे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर पोस्ट केले आहे.

काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी हज अनुदानबंदीबाबतचे व्यंगचित्र काढले होते. त्यात त्यांनी नरेंद्र मोदींच्या निर्णयाचे कौतुक केले होते. मात्र आज काढलेल्या व्यंगचित्रात राहुल गांधी यांना गुजरात निवडणुकांच्या निकालानंतर मोठे झालेले दाखवून मोदी-शहा मिळूनही काँग्रेसला जास्त जागा मिळवण्यापासून रोखू शकले नाहीत असेच राज ठाकरेंना ध्वनित करायचे आहे असे दिसून येते आहे. गेल्या महिन्या भरात अनेक घडामोडी घडल्या त्यावरील व्यंगचित्रांचा बॅकलॉग बाकी होता तो आता मी भरून काढतो आहे असे राज ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर म्हणत हे व्यंगचित्र पोस्ट केले आहे.

तुम्हाला माझे फटकारे आवडतील आणि त्यातून तुम्ही काही बोध घ्याल अशी आशा करतो असेही राज ठाकरे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर म्हटले आहे. आता येत्या काळात राज ठाकरेंच्या कुंचल्याचे फटकारे आणखी कोणाकोणाला बसणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2018 8:21 pm

Web Title: raj thakre post his new caricature on gujarat polls on his facebook page
Next Stories
1 स्वतंत्र लढण्यास भाजपाही तयार: आशिष शेलार
2 सध्या आमची युती, सरकार ५ वर्षे पूर्ण करेल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3 लोकसभा व विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार; शिवसेनेची घोषणा
Just Now!
X