गुजरात निवडणूक निकालावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्र काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. १, २ आणि ३ असे क्रमांक रेखाटून त्यावर क्रमांक १ वर नरेंद्र मोदी आणि अमित शहा उभे राहिलेले दाखवण्यात आले आहेत. तर क्रमांक २ वर राहुल गांधी दाखवण्यात आले आहेत. मात्र काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची उंची मोदी आणि शहा यांच्यापेक्षा जास्त दाखवण्यात आली आहे. तर इतरांना तिसऱ्या क्रमांकावर स्थान देण्यात आले आहे. ते अगदीच कमकुवत दाखवण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुजरात हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बालेकिल्ला आहे. त्या ठिकाणी झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने भाजपला काँटे की टक्कर दिली हे सगळ्या देशाने पाहिलेच. अशात आता राज ठाकरे यांनीही राहुल गांधी यांचे महत्त्व गुजरातमुळे वाढल्याचे त्यांच्या व्यंगचित्रातून दाखवले आहे. गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला १५० जागा मिळतील अशी सिंह गर्जना अमित शहा यांनी केली होती. मात्र प्रत्यक्षात भाजपला ९९ जागा मिळाल्या. तर काँग्रेसनेही ८० च्यावर जागा मिळवत भाजपला दे धक्का काय असतो हा अनुभव दिला. याच निवडणूक निकालावर भाष्य करणारे व्यंगचित्र आता राज ठाकरे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर पोस्ट केले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thakre post his new caricature on gujarat polls on his facebook page
First published on: 23-01-2018 at 20:21 IST