मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदावरून दूर करण्यात आलेले डॉ. राजन वेळुकर हे मंगळवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना भेटणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यपालांनी वेळुकर यांना कामापासून दूर राहण्याचे आदेश दिले होते.
मात्र वेळुकरांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्या वेळेस उच्च न्यायालयाच्या शोध समिती नेमण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्या पाश्र्वभूमीवर ही भेट होणार आहे. राजभवनातूनही भेटीच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. यामुळे विद्यापीठ संकुलात वेळुकर पुन्हा कुलगुरू पदावर रुजू होतील की नाही, ही चर्चा रंगली होती.