14 August 2020

News Flash

Video : दादरमधील राजगृह म्हणजे आंबेडकरांच्या आठवणींचा ठेवा

जाणून घ्या दादरमधील राजगृहाचे ऐतिहासिक महत्व

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृह या ठिकाणी मंगळवारी संध्याकाळी अज्ञातांनी तोडफोड केली. राजगृह या ठिकाणी असलेला सीसीटीव्ही कॅमेरा आणि झाडांच्या कुंड्या यांची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. राज्यातील नेतेमंडळीनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी राजगृहाच्या आवारात झालेल्या या तोडफोडीचा निषेध केला आहे. दादर येथील राजगृह हे आंबेडकरांनीच उभारलेलं आहे. ही वास्तू म्हणजे आंबेडकरांच्या ग्रथंसंपदेबरोबरच त्यांच्याशी संबंधित अनेक आठवणींना उजाळा देणारी वास्तू आहे. याचसंदर्भात लोकसत्ता डॉट कॉमने २०१८ साली बाबासाहेबांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त याच राजगृहाचे महत्व सांगणारा खास व्हिडिओ तयार केला होता. चला तर मग जाणून घेऊयात काय आहे या वास्तूचे महत्व…

या व्हिडिओवरुन ही वास्तू किती महत्वाची आहे आणि त्याचा ऐतिहासिक वारसा किती मोठा आहे याचा अंदाज तुम्हाला नक्कीच आला असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 10:07 am

Web Title: rajgruha historical importance of dr br ambedkars house in dadar mumbai scsg 91
Next Stories
1 अरुण गवळी पुन्हा तुरुंगाबाहेर
2 “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य, विचारांवरील श्रद्धेला कुणीही धक्का लावू शकत नाही”
3 राजगृह तोडफोड प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करा, देवेंद्र फडणवीसांची मागणी
Just Now!
X