काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात सुरू केलेल्या राजीव गांधी जीवनदायी योजनेचे नाव बदलून महात्मा फुले यांचे नाव देण्यास काँग्रेसने तीव्र विरोध दर्शविला आहे. सरकारने नवीन योजनेला फुले यांचे नाव द्यावे, अशी मागणी केली आहे.

योजनेचे नाव बदलण्याचा हा पूर्णपणे राजकीय निर्णय असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.केंद्राप्रमाणचे राज्यातील सरकार सुडाने वागू लागले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने अपघात विमा योजना सुरू करण्यात आली. याच धर्तीवर फुले यांच्या नावे दुसरी योजना सरकारला सुरू करता आली असती, पण सरकारने मुद्दामहून हा निर्णय घेतला आहे. राजीव गांधी यांचे नाव बदलण्याच्या निर्णयाच्या विरुद्ध पक्षाच्या वतीने आंदोलन केले जाईल, असा इशाराही चव्हाण यांनी दिला.

महात्मा फुले यांचे नाव सरकारी योजनेला देण्यास पुढाकार घेऊन शिवसेनेने मतांच्या राजकारणाकरिता त्याचा वापर केला आहे.