News Flash

पिंपरी-चिंचवडमध्ये लवकरच राजीव गांधी विज्ञान नगरी

पुणेलगत पिंपरी चिंचवड येथे आठ एकर जागा उपलब्ध असून त्यापैकी एक एकर जागेत यापूर्वी तेथे विभागीय पातळीचे विज्ञान केंद्र उभारण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये लवकरच राजीव गांधी विज्ञान नगरी

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी आणि भविष्यात वैज्ञानिक घडविण्यासाठी  पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात भारतरत्न राजीव गांधी विज्ञान आविष्कार नगरी उभारण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

एकविसाव्या शतकातील आधुनिक भारत घडविण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाची गरज ओळखून भारताला समृद्ध बनविण्याचे स्वप्न पूर्ण करणे, त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, भविष्यात वैज्ञानिक घडविणे, तंत्रज्ञानाचा सामाजिक विकासासाठी उपयोग करणे, आनंददायी पद्धतीने विज्ञान शिकवणे, अनुभवात्मक शिक्षण, विज्ञानावर आधारित विविध संकल्पनांचे सादरीकरण, प्रदर्शन आदी बाबी विचारात घेऊन त्याची माहिती आणि ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यासाठी राज्यात जागतिक दर्जाच्या विज्ञान आविष्कार नगरीची स्थापना करण्यात येणार आहे. केंद्रपुरस्कृत योजनेंतर्गत ही नगरी उभारली जाणार  आहे.

होणार काय?

पुणेलगत पिंपरी चिंचवड येथे आठ एकर जागा उपलब्ध असून त्यापैकी एक एकर जागेत यापूर्वी तेथे विभागीय पातळीचे विज्ञान केंद्र उभारण्यात आले आहे. उर्वरित सात एकर जागेवर जागतिक  दर्जाची, विज्ञानातील विविध संकल्पनांवर आधारित भारतरत्न राजीव गांधी विज्ञान आविष्कार नगरी  पुढील पाच वर्षांत उभारण्यात येणार आहे.

निधीमान्यता…

सात एकरांवर ही विज्ञान नगरी उभारली जाणार असून, त्यासाठी लागणाऱ्या १९१ कोटी रुपयांच्या खर्चासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2021 12:22 am

Web Title: rajiv gandhi science city in pimpri chinchwad soon akp 94
Next Stories
1 राज्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालये
2 मुंबईला डेंग्यूचा ताप
3 संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत रविवारी ‘माझा डॉक्टर’ परिषद
Just Now!
X